Jitendra Awhad: '10-15 दिवसांनी जाणीव होते आपली विकेट गेली', जितेंद्र आव्हाडांचा रोख कोणाकडे?

पुरोगामी महाराष्ट्राचा एकमेव आवाज म्हणजे शरद पवार असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे
Jitendra Awhad on Praful Patel
Jitendra Awhad on Praful PatelEsakal

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि इतर बड्या नेत्यांनी भाजप-शिवसेना यांच्यासोबत सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. २ जुलै २०२३ ला अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर त्यांच्यासह इतर नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता राष्ट्रवादीत घडामोंडींना वेग आला आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर अजित पवार गटाने दोन वेळा शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये अजित पवार गटाने शरद पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अजित पवार गटाच्या नेत्यांनी सांगितले कि, 'आम्ही शरद पवारांची भेट घेतली आम्ही आमचं म्हणणं त्यांच्यासमोर मांडलं ते त्यांनी ऐकून घेतलं मात्र ते काहीचं बोलले नाहीत', तर या सगळ्या घडामोडींनंतर जितेंद्र आव्हाड यांनी सूचक ट्वीट केलं आहे.

Jitendra Awhad on Praful Patel
Opposition Meeting: विरोधकांच्या बैठकीला शरद पवार राहणार उपस्थित; भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर...

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले आहेत?

पुरोगामी महाराष्ट्राचा एकमेव आवाज…शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचा खरा प्रतिनिधी, आणि राजकारणात संयमाला किती महत्त्व आहे हे कोणाकडून शिकावं? एकच नाव शरद पवार. कोणाची विकेट कशी गेली हे विकेट गेलेल्या माणसालाही समजत नाही. १०-१५ दिवसांनी जाणीव होते आपली विकेट गेली. बंडाला १५ दिवस झाल्यावर हे ट्वीट आव्हाडांनी केल्यामुळे आता कुणाची विकेट जाणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.(Latest Marathi News)

तर मी गुगली टाकली अन् देवेंद्र फडणवीसांची विकेट गेली असं वक्तव्य शरद पवारांनी काही दिवसांपुर्वी पहाटेच्या शपथविधीबाबत भाष्य करताना म्हटलं होतं, तर आता कोणाची विकेट जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Jitendra Awhad on Praful Patel
Oommen Chandy Passed Away: केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चांडी यांचं निधन

अजित पवार गटाच्या नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट

दरम्यान अजित पवार गटाचे आमदार गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार यांची वाय. बी. सेंटर येथे भेट घेत आहेत. अजित पवार गट शरद पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. शरद पवार गटाला अजित पवार आणि त्यांचे आमदार का भेट घेत आहेत? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.(Latest Marathi News)

अजित पवारांच्या गटातील आमदारांनी वाय. बी. चव्हाण सेंटरवर भेट घेतली. यावेळी प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरेही उपस्थित होते. जवळपास दीड तास चाललेल्या या बैठकीनंतर कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली.

Jitendra Awhad on Praful Patel
Monsoon Assembly Session: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हसन मुश्रीफांची ओळख करुन देताच सभागृहात 'जय श्रीराम'चे नारे

प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या भेटीवर काय म्हणाले?

'आज अजित पवार आमदार शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी वाय बी चव्हाण सेंटरवर आले होते. काल अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सर्व मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि मी इथे आलो होतो. काल रविवार असल्यामुळे आमदार आपापल्या मतदारसंघात होते. आज विधिमंडळाचं अधिवेशन चालू झाल्यामुळे बरेच आमदार आज हजर होते. त्यामुळे आमदारांना शरद पवारांचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळावी यासाठी आम्ही इथे आलो', असं प्रफुल्ल पटेल भेटीवर म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

Jitendra Awhad on Praful Patel
Monsoon Assembly Session: राज्यात लवकरच कॅसिनो सुरू होणार? शिंदे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com