Opposition Meeting: विरोधकांच्या बैठकीला शरद पवार राहणार उपस्थित; भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर...

विरोधकांच्या बैठकीचा आज दुसरा दिवस, शरद पवार राहणार उपस्थित
Opposition Meeting
Opposition MeetingEsakal
Updated on

आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सत्ताधारी आणि विरोधक यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. तर देशभरात भाजपविरोधी पक्षांनी एकत्रित येत लढण्यासाठी विरोधी पक्षांचे प्रयत्न सुरु केले आहेत. विरोधी पक्षांची पहिली बैठक पाटणा येथे पार पडली.त्यानंतर आता विरोधी पक्षांची दुसरी बैठक बंगळुरुमध्ये आयोजीत करण्यात आली आहे. या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे.

एकीकडे भाजप विरोधी पक्ष एकत्रित येत आहेत तर दुसरीकडे भाजपकडून दिल्लीत एनडीएच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान आज बुंगळुरुमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत रवाना झालेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ते आज सकाळी बैठकीसाठी बंगळुरुला रवाना झाले आहेत. 2024 च्या निवडणुकीत भाजप विरोधात एकजुट होण्यासाठी विरोधकांची चर्चा सुरु आहे.

विरोधी पक्षांच्या बैठकीचा आज दुसरा आणि महत्वाचा दिवस आहे. या बैठकीला देशभरातील 26 पक्ष हजेरी लावणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणूकीवर रणणीती ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत एकास एक उमेदवार देणे, जागावाटपाचा नेमका फॉर्म्युला काय असावा, विरोधकांच्या एकीला काय नाव देण्यात यावं यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Opposition Meeting
Oommen Chandy Passed Away: केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चांडी यांचं निधन

पटणामध्ये झालेल्या बैठकीत 17 पक्षांचे नेते सहभागी झाले होते, मात्र या बैठकीला आज 26 पक्षांची हजेरी लावणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे कालच बेंगळुरूत दाखल झाले आहेत, आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बेंगळुरूला रवाना झाले आहेत.

Opposition Meeting
Monsoon Assembly Session : विरोधी पक्ष नेता कोणाला करावे? रोहित पवारांनी काँग्रेसला केली ही विनंती

राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत शरद पवार पहिल्यांदा येत आहेत. त्यामुळं भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर देखील चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, आपचे अरविंद केजरीवाल, पिडीपीच्या महेबुबा मुफ्ती, सपाचे अखिलेश यादव, तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, राजदचे लालूप्रसाद यादव, जेडेयुचे नितीश कुमार यांच्यासह अनेक पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मात्र बैठकीला हजेरी लावलेली नाही.

Opposition Meeting
Monsoon Assembly Session: विरोधी पक्ष नेते पदाच्या दालनात अजित पवार! विरोधी पक्ष नेत्याला ऑफिस नाहीच?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.