जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरेंना म्हणाले, आता संचारबंदी हाच उपाय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८९ वर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत तीन बळी कोरोनाने घेतले आहेत. काल एक दिवसाचा 'जनता कर्फ्यू' झाला. पण लोक पुन्हा मूळपदावर आले आहेत.

मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्या 89 झाली आहे. नागरिक गांभीर्याने घेत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता संचारबंदी हाच एकमेव उपाय आहे, असे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८९ वर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत तीन बळी कोरोनाने घेतले आहेत. काल एक दिवसाचा 'जनता कर्फ्यू' झाला. पण लोक पुन्हा मूळपदावर आले आहेत. मुंबईसारख्या शहरात सार्वजनिक वाहतूक बंद असली तरी खासगी वाहनांतून प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी व्हायला तयार नाही. अशावेळी खरंतर संचारबंदी असायला हवी, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

मुंबईतील टोलनाक्यावर वाहनांची गर्दी झाल्याचे आज सकाळी वाहिन्यांवर दाखविण्यात आल्यानंतर सरकारने दखल घेतली आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळू नका, घराबाहेर पडून नका असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. यावर आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे, की तुमच्या कामाची प्रशंसा होते आहे पण काही जण गंभीर नाहीत. संकट किती भयंकर आहे याची कल्पना काही लोकांना नाही. लॉक डाउनने भागेल असे वाटत नाही संचारबंदी लागू करा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jitendra Awhad urge to cm uddhav thackeray on curfew