Ruta Awhad: जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीचे 'त्या' महिलेवर गंभीर आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ruta Awhad

Ruta Awhad: जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीचे 'त्या' महिलेवर गंभीर आरोप

माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड हर हर महादेव चित्रपटाच्या वादानंतर पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. गेल्या आठवडाभरात जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेला हा दुसरा गुन्हा असून यावेळी एका 40 वर्षीय महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत. या सगळ्यावर अनेक नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भाष्य केलं आहे. दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तक्रार दाखल करणाऱ्या महिलेकडे मोटीव्ह होतं. तक्रार दाखल करणारी महिला जामिनावर बाहेर आहे असंही त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा: Jitendra Awhad: आव्हाड पुन्हा अडचणीत, महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आठवडाभरात दुसरा गुन्हा दाखल

इतकी गर्दी असताना त्यांनी हाताला धरून बाजूला केलं होतं. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर त्यांना लक्षात आलं मला हाताने धरून बाजूला केलं. त्यांना 4 तासानंतर आठवतं का की त्यांनी हाताला धरून बाजूला केलं ते. राज्यात असल्या गोष्टींशिवाय दुसरं काही उरलंच नाही का? असा प्रश्नही ऋता आव्हाड यांनी केला आहे. हा गुन्हा दाखल करण्यामाग कोण आहे हे सर्वाना माहीत आहे. हे सर्व जाणूनबुजून केलं जात आहे. असंही त्या पुढे म्हणाल्यात.

काल आमच्या महिला कार्यकर्त्याही गर्दीत खाली पडल्या होत्या त्यांनी तक्रार करायची का मग? आम्हाला मारहाण केली खाली पडली म्हणून असा सवलही त्यांनी केला आहे.कायद्याचा गैरवापर होत आहे. सर्वच गोष्टींचा आता अतिरेक सुरू आहे असंही त्या म्हणाल्या आहेत.

हेही वाचा: Jitendra Awhad: 'मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय'; आव्हाडांच्या ट्वीटमुळे खळबळ

ज्या महिलेने आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे ती महिला आधीच जामिनावर बाहेर आहे. तसेच आव्हाड यांनी कार्यक्रमात ढकलल्यानंतर चार तासाने तुम्हाला ढकलल्याची जाणीव होते काय? असा सवाल करतानाच विनयभंग होतो तर मग गर्दीच्या ठिकाणी जाताच कशाला? असा संतप्त सवाल ऋता आव्हाड यांनी केला आहे.

सार्वजनिक ठिकाणी कसं वागलं पाहिजे हे मलाही कळतं. कालच्या कार्यक्रमात प्रचंड गर्दी होती. तिथे आमच्या कार्यकर्त्याही खाली पडल्या. मग त्यांनी गुन्हा दाखल करायचा का? आम्हाला मारहाण झाली असं आमच्या कार्यकर्त्यांनी म्हणायचं का? तुमचा विनयभंग होतो तर गर्दीत जाऊ नका. कोणी तुम्हाला जायला सांगितलं? असा सवाल त्यांनी केला आहे.

टॅग्स :NCPjitendra awhad