
Shashikant Varishe : वारिशेंचा अपघात जाणीवपूर्वक घडवून आणला; सरकारची कबुली
राजापूर इथले पत्रकार शशिकांत वारिशे यांचा मृत्यू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू आहे. त्यातून वारिशेंचा अपघात जाणीवपूर्वक घडवून आणल्याची कबुल राज्य सरकारने दिली आहे. (Shashikant Varishe's accident done by purpose)
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात विरोधकांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला राज्य सरकारने लेखी उत्तर दिलं आहे. त्या उत्तरात सरकारने या अपघाताबद्दल लिहिलं आहे. यापूर्वी या प्रकरणातला आरोपी पंढरीनाथ आंबेरकर यानेही वारिशेंवरचा हल्ला पूर्वनियोजित असल्याची कबुली दिली होती.
शशिकांत वारिशे यांची जाणीवपूर्वक नाणार परिसरात वाहन अपघात घडवून आणला, असं राज्य सरकारने विरोधकांच्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरामध्ये म्हटलं आहे. तसंच सध्या या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू असल्याची माहितीही दिली आहे.