पुणे/ मुंबई - गोविंदा आला रे...आला...च्या जयघोषात राज्यभरातील गोविंदा पथकांनी थरांचे उच्चांक नोंदवत शनिवारी दहीहंडीचा आनंद द्विगुणित केला. राज्यात काही भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने भाविक अधिकच उत्साही झाले. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर नाशिकसह राज्यातील प्रमुख शहरांत दहीहंडीचा जल्लोष पाहवयास मिळाला.