उजनी धरणात १२२ टीएमसी पाणी! २० जूनपासून धरणातून सोडले पुन्हा एकदा धरण भरेल इतके पाणी; धरणाच्या पाण्यावर दररोज २ कोटी ३० लाख युनिट वीजनिर्मिती

मे अखेर उणे पातळीत असलेले उजनी धरण सध्या १०५.५९ टक्के भरले आहे. जूनमधील पावसाने उजनीतील पाण्याची आवक वाढली आणि २० जूनपासून धरणातून भीमा नदी, कालव्यातून पाणी सोडणे सुरू झाले. तेव्हापासून २ सप्टेंबरपर्यंत उजनीतून तब्बल ११७ टीएमसी म्हणजेच आणखी एक उजनी पूर्ण क्षमतेने भरले असते, इतके पाणी सोडण्यात आले आहे.
power house
power housesakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : मे अखेर उणे पातळीत असलेले उजनी धरण सध्या १०५.५९ टक्के भरले आहे. जूनमधील पावसाने उजनीतील पाण्याची आवक वाढली आणि २० जूनपासून धरणातून भीमा नदी, कालव्यातून पाणी सोडणे सुरू झाले. तेव्हापासून २ सप्टेंबरपर्यंत उजनीतून तब्बल ११७ टीएमसी म्हणजेच आणखी एक उजनी पूर्ण क्षमतेने भरले असते, इतके पाणी सोडण्यात आले आहे.

सध्या उजनी धरणाचे सहा दरवाजे दोन फुटाने उघडले असून धरणातून दहा हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला आहे. दौंडवरून आठ हजार तर स्थानिक परिसरातून साडेचार-पाच हजार क्युसेकचा विसर्ग उजनीत जमा होत आहे. उजनी पूर्ण क्षमतेने भरल्याने पूर नियंत्रणासाठी वेळोवेळी नदीतून, कालव्यातून, सीना-माढा, दहिगाव उपसा सिंचन योजनांमधून देखील पाणी सोडले जात आहे.

उजनीत ११० टक्के म्हणजेच १२२ टीएमसी पाणी मावते. सध्या धरणात १२० टीएमसी पाणीसाठा आहे. आता पावसाळा आणखी महिनाभर असल्याने धरणात येणारा विसर्ग आहे तसा खाली सोडून दिला जात आहे. यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने पुढील पावसाळ्यापर्यंत शेतीसह पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे. उन्हाळ्यात उजनीतून शेतकऱ्यांसाठी तीन आवर्तने मिळतील.

दोन कोटी ३० लाख युनिट वीजनिर्मिती

उजनीतून २० जूनपासून धरणाजवळील विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी १६०० क्यूसेक पाणी सोडण्यास सुरवात झाली. तेथे प्रतितास १२ हजार युनिट वीज तयार होते. दररोज त्याठिकाणी दोन लाख ८८ हजार युनिट वीज तयार होत असून आतापर्यंत उजनीच्या पाण्यावर तेथील वीजनिर्मिती प्रकल्पाने तब्बल दोन कोटी ३० लाख युनिट वीज तयार केली आहे. ती वीज चालू दराप्रमाणे ‘महावितरण’ला विकली असून त्यातून अंदाजे पाच कोटींहून अधिक रक्कम मिळणार आहे.

उजनीची सद्य:स्थिती

  • एकूण पाणीसाठा

  • १२०.२२ टीएमसी

  • उपयुक्त पाणीसाठा

  • ५६.५७ टीएमसी

  • पाण्याची एकूण टक्केवारी

  • १०५.५९ टक्के

  • धरणातून सोडलेला विसर्ग

  • १२,२२० क्यूसेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com