Jyeshtha Gauri Pujan
Jyeshtha Gauri Pujan

Jyeshtha Gauri Pujan: मुस्लीम कुटुंबाच्या घरातही गौरीचे आगमन! विधीवत साजरा केला ज्येष्ठा गौरीचा उत्सव...

Jyeshtha Gauri Pujan

ब्रह्मपुरी(सोलापूर) : हिंदू धर्मात गणेश उत्सव सण साजरा करण्यास महत्त्व असून ज्येष्ठा गौरी गणपतीच्या आगमनासाठी वर्षभर प्रतीक्षा करतात. गणेश उत्सव आला तर गणेश भक्त बाप्पाच्या भक्तीत तल्लीन होतात. नाचत-गाजत ते आपल्या घरी गणपती व गौरीची प्रतिष्ठास्थापना करतात.

गणेशोत्सव सर्व धार्मिक सण, जाती धर्मांना जोडून समाजाला एकसंध करतो. याचे उदाहरण माचणूर (ता.मंगळवेढा) येथील शेख कुटुंबीयांनी ठेवले आहे. ब्रिटिशांविरोधात सामाजिक एकोप्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप दिले. सामाजिक एकोप्याची ही परंपरा शेख कुटुंबाने जपली आहे. या कुटुंबात वीस वर्षांपासून गौरी गणपतीचा उत्सव साजरा होतो. 

माचणूर येथील शेख कुटुंबियाने गणेश उत्सवात गौरी गणपतीची स्थापना केली. यासाठी शेख कुटुंबाने घरामध्ये विद्युत रोषणाई व आकर्षक फुलांनी सजावट केली होती. गौरी गणपतीची पूजा करून त्यांनी मोठ्या भक्तीत विसर्जन देखील केले. शेख कुटुंबाने ज्येष्ठा गौरींची स्थापना करत ऐक्याचा संदेश दिला आहे. 


जात, धर्म यांच्या चौकटी मोडत माचणूर येथील एका मुस्लीम कुटुंबियांने त्यांच्या घरात गौरी-गणपतीची प्रतिष्ठापना केली.  शेख कुटुबियांकडे वीस वर्षांपासून ज्येष्ठा गौरी गणपती साजरा केला जात आहे.  त्यामुळे त्यांचं तालुक्यात चांगलंच कौतुक होत असते. 


देशात, राज्यात आणि महत्वाचं म्हणजे लहान मोठ्या गावांमध्ये जातीय तेढ वाढत असताना त्यांनी राखलेला हा सामाजिक सलोखा  वाखाणण्याजोगे आहे. कुठल्याही जाती आणि धर्मामध्ये भेदभाव न करता सर्वांनी एकोप्याने राहावं असा संदेश त्यांनी या माध्यमातून दिला आहे.  शेख कुटुंबात पैगंबर शेख, बेगम शेख, एक मुलगा व एक मुलगी असून सूना व नातवंडे असा परिवार आहे. सहाही जणांनी मनोभावे गौरी गणपतीची पूजा केली. जाती-धर्माच्या भिंती ओलाडून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

Jyeshtha Gauri Pujan
Nashik Ganeshotsav News : रहीम शेख यांच्याकडून ऐक्याचे दर्शन; छगन भुजबळांकडून कौतुक

बेगम शेख या घरोघरी जाऊन महिलांना बांगड्या भरण्याचा व्यवसाय करतात. व्यवसायाच्या निमित्ताने हिंदू धर्मियांच्या घरी गेल्यानंतर आपल्याही घरी गौरी गणपतीचा सण साजरा करावा, अशी त्यांची इच्छा होती.  अशातच त्यांचे सासरे पैगंबर शेख यांना बेगमपूर येथे जात असताना लक्ष्मीचे मुकुट व धागे सापडले होते. (Latest Marathi News)

परंतु आपण मुस्लीम असल्याने आपल्या धर्मात गौरी गणपतीचा सण साजरा केला जात नाही, अशी त्यांच्या मनात शंका होती. दरम्यान त्यांच्या ही शंका त्यांच्या पत्नी बेगम यांनी दूर करून आपल्या घरी गौरी गणपती सण साजरा करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वीस वर्षांपासून शेख कुटुंबीय मनोभावे गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्यांच्या या उत्साहात गावातील मुस्लीम समाजासह सर्व जातींचे व‌ धर्माच्या महिला सहभागी होतात.

गौरी गणपती सण साजरा करत असल्यापासून आमच्या घरात सुख समृद्धी नांदत असल्याची भावना बेगम शेख यांनी व्यक्त केली आहे.

"माचणूर येथील ग्रामदैवत असलेले सिद्धेश्वर मंदिरास नगारा वाजवण्याचा मान मुस्लीम समाजाचा आहे. आम्ही गावातील हिंदू-मुस्लीम बांधव एकोप्याने राहत आहोत."
-बाळकृष्ण कलुबर्मे, माचणूर

Jyeshtha Gauri Pujan
Ambadas Danve : बँक खाते मोदींनी स्वतःच्या पैशाने उघडले का? अंबादास दानवेंचा सवाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com