'मनसेसाठी कल्याण-डोंबिवलीची जागा'

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

मनसेला आघाडीत घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व मी स्वत: राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

लोकसभा 2019 ः मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाआघाडीत सहभागी व्हावे, अशी राष्ट्रवादीची इच्छा आहे. त्यासाठीच राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती अजित पवार यांनी काल (ता.14) झालेल्या बैठकीनंतर दिली. मनसेला कल्याण-डोंबिवली हा लोकसभा मतदारसंघ सोडण्यास राष्ट्रवादीची तयारीही असल्याची चर्चा झाली. मात्र, काँग्रेससोबत चर्चा करूनच निर्णय जाहीर केला जावा, अशी भूमिका काही नेत्यांनी बैठकीत मांडली.

मनसेला आघाडीत घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व मी स्वत: राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटप निश्‍चित झाले असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे. आता काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व माझ्यात अखेरची बैठक होणार आहे. त्यानंतर जागावाटपाचे सूत्र जाहीर केले जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

Web Title: Kalyan Dombivali Loksabha seat for MNS