Kalyan Lok Sabha Result: मनसेचा झाला श्रीकांत शिंदेंना फायदा, आ. पाटीलांनी दिलेला शब्द पाळला !

Shrikant Shinde Wins Kalyan Lok Sabha Election 2024: कल्याण लोकसभेचा निकाल जाहीर झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे विजयी झाले आहेत.
 मनसेचा झाला  श्रिकांत शिंदेंना फायदा, आ. पाटीलांनी दिलेला शब्द पाळला !
Kalyan Lok Sabha Resultsakal

Dombivali News: कल्याण लोकसभेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयाच्या या हॅट्रीक मध्ये कल्याण ग्रामीणचा मोठा वाटा असल्याचे दिसून येते आहे. केवळ या एका विधानसभा क्षेत्रातून शिंदे यांनी 1 लाख 51 हजार मते मिळविली आहेत.

2019 च्या तुलनेत यंदा 5 टक्क्यांनी मतदान येथे जास्त झाले असून त्याचाच फायदा शिंदे यांना झाला आहे. मनसेचे पंतप्रधान मोदी यांना बिनशर्त पाठींबा दिल्यानंतर खासदार शिंदे यांच्या विजयासाठी आमदार पाटील प्रयत्न करत होते. मनसेचा आधीचा असलेला प्रखर विरोध पाहता मनसे साथ नक्की देईल ना ? असे बोलले जात होते.

 मनसेचा झाला  श्रिकांत शिंदेंना फायदा, आ. पाटीलांनी दिलेला शब्द पाळला !
Kalyan Loksabha: डॉ.शिंदें तिसऱ्यांदा खासदार; अशा प्रकारे उल्हासनगरात साजरा झाला विजय!

मात्र शंका घ्यायची गरज नाही मनसे काम करणार हा शब्द पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोर खासदारांना दिला होता आणि तो खरा करुन दाखविला असल्याचे आता बोलले जात आहे.

कल्याण लोकसभेचा निकाल जाहीर झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे विजयी झाले आहेत. या मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवित त्यांनी आपला विजय संपादन केला आहे. खासदार शिंदे यांचा 2 लाखांच्या फरकाने विजय झाला असला तरी त्यांना अपेक्षित असे मताधिक्य मिळविता आलेले नाही.

ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी पावणे चार लाख मते मिळवित या मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाची ताकद शिंदे गटाला दाखवून दिली आहे. तर शिंदे गटास येथे विजय मिळवून आणताना मोठी कसरत करावी लागली आहे. ही विजयश्री खेचून आणण्यात मनसेचा मोठा हातभार असून कल्याण ग्रामीणच्या मतांनी शिंदे यांना तारले असल्याचे बोलले जात आहे.

 मनसेचा झाला  श्रिकांत शिंदेंना फायदा, आ. पाटीलांनी दिलेला शब्द पाळला !
Kalyan Loksabha: डॉ.शिंदें तिसऱ्यांदा खासदार; अशा प्रकारे उल्हासनगरात साजरा झाला विजय!

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठींबा दिल्यानंतर कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना विजयी करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन शिवसेनेस दिले.

आमदार पाटील आणि खासदार शिंदे यांच्यामध्ये 2014 च्या निवडणूकीपासून वैर होते. मात्र ते राजकीय वैर असून वैयक्तीक कोणतेच मतभेद आमच्यात नाही. पक्षप्रमुखांचा आदेश असून त्यानुसार आम्ही शिंदे यांच्यासाठी काम करणार असे पाटील नंतर वारंवार सांगत असत.

कल्याण लोकसभेत मनसेच्या पाठिंब्याशिवाय कोणाचाही खासदार होऊ शकत नाही असं मनसे आमदार राजू पाटील यांनी माध्यमांसमोर ठणकावून सांगितलं होतं. यानंतर मनसेने देखील कल्याण लोकसभेची तयारी सुरू केली होती. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. यानंतर मनसे आणि शिवसेनेची मन काही काळातच जुळलेली कल्याण लोकसभेत दिसुन आली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार राजू पाटील यांचे असलेले घनिष्ठ संबंध आणि डॉ.शिंदेंची आमदार पाटील यांच्याशी असलेली मैत्री यशस्वी झाली आहे.

 मनसेचा झाला  श्रिकांत शिंदेंना फायदा, आ. पाटीलांनी दिलेला शब्द पाळला !
Kalyan Loksabha: एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे आघाडीवर, लवकरच मिळवणार विजयी आघाडी?

कल्याण ग्रामीण विधानसभेतून सर्वाधिक मतदान डॉ.शिंदेंना मिळवून देण्याचा मानस आमदार राजू पाटील यांनी केला होता. यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रत्यक्ष शिंदेंसाठी प्रचार दौरे करत अनेक सभांमध्ये कार्यकर्त्यांसह उपस्थिती दाखवली होती. पहिल्या तीन टप्प्यात कल्याण ग्रामीणमधून डॉ.शिंदे हे आघाडीवर असल्याचे दिसून आले होते. मात्र यानंतर निवडणूक आयोगाकडून विधानसभा निहाय मतदानाची आकडेवारी देण्याचे बंद केले आहे. मात्र डॉ.शिंदेंना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी मनसेने केलेले प्रयत्न यशस्वी झाले आहेत.

राज ठाकरे यांनी कळव्यात घेतलेली सभा, मनसे आमदार राजू पाटील यांनी डोंबिवलीत शिंदेसाठी घेतलेला मेळावा आणि कल्याण लोकसभेत मनसेच्या कार्यकर्ते यांनी घेतलेली मेहनत ही शिंदेच्या पथ्यावर पडली असून विजय मार्ग सोपा झाला.दरम्यान विजयानंतर मनसेचे आमदार राजू पाटील, जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर,जिल्हा संघटक हर्षद पाटील यांनी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केल आहे

 मनसेचा झाला  श्रिकांत शिंदेंना फायदा, आ. पाटीलांनी दिलेला शब्द पाळला !
Kalyan Loksabha: एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे आघाडीवर, लवकरच मिळवणार विजयी आघाडी?

. कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे सलग तिसऱ्यांदा दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत. या विजयामध्ये मनसे आमदार राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघाने डॉ. शिंदे यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे. तर त्याखालोखाल डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण पूर्व, उल्हासनगर आणि मग कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक लागत आहे.

डॉ. श्रीकांत शिंदे यांना मिळालेली विधानसभानिहाय मते...

कल्याण ग्रामीण - 1 लाख 51 हजार 702

डोंबिवली - 99 हजार 734

अंबरनाथ - 93 हजार 670

कल्याण पूर्व - 87 हजार 129

उल्हासनगर 85 हजार 698

मुंब्रा कळवा - 69 हजार 988

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com