
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी मंत्रोच्चाराने सोयाबीन पीक वाढवण्याचा दावा केल्यानं आता नवा वाद निर्माण झालाय. वसंतराव नाईक प्रतिष्ठान आणि वनराई फाउंडेशनतर्फे कांचन गडकरी यांना प्रयोगशील शेतकरी पुरस्कार देण्यात आला. कांचन गडकरी या सेवा सदन संस्थेच्या अध्यक्षा आहेत. कांचन गडकरी यांनी मंत्रोच्चारानं पीक वाढतं या केलेल्या दाव्यात तथ्य नाही, हा दावा अशास्त्रीय आहे असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हटलंय. तसंच या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱअया पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगरु आणि इतर मान्यवरांनीही आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी अंनिसने केलीय.