कंगनाच्या वादग्रस्त विधानावर खासदार अमोल कोल्हे म्हणतात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amol Kolhe

कंगनाच्या वादग्रस्त विधानावर खासदार अमोल कोल्हे म्हणतात...

डॉक्टर आणि अॅक्टर आणि मग राजकारणात आलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे हे सध्या आपल्या सिंहावलोकनामुळे चर्चेत आहेत. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपुर्वी एक पोस्ट टाकली आणि त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्याला मानसिक थकवा आला असून, आपण काही दिवसांसाठी चिंतण करायला जात असल्याचं सांगितलं. त्यानंतर ते आता पुन्हा एकदा आपल्या दैनंदिन कामात रुजू झाले असून, त्यांनी आज साम टीव्हीला एक विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये खासदार कोल्हेंनी कंगणा रानावतने केलेल्या वादग्रस्त विधानवर प्रतिक्रीया दिली.

हेही वाचा: 'कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो'; विक्रम गोखले

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतने नुकतंच एक वादग्रस्त विधान केलं. यावेळी कंगना रानावतने देशाला १९४७ ला नाही तर २०१४ ला स्वातंत्र्य मिळाल्याचं वक्तव्य केलं. या वक्तव्यावरून सध्या एका नव्या वादाला सुरूवात झाली आहे. यावर बोलताना अमोल कोल्हेंनी नाव न घेता कंगनाला खडेबोल सुनावले. देशात सध्या ध्रुवीकरणाचं राजकारण सुरू आहे असं म्हणत, या अभिनेत्रीने केलेलं विधान हे याच मानसिकतेतून येतं का? असा प्रश्न उपस्थित होतो असं सांगितलं. ते म्हणाले, "परवा एका अभिनेत्रीने जे विधान केलं, हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱ्या आपल्या कुटुंबाला देशोधडीला लावणाऱ्या हुतात्म्यांच्या हौतात्म्याचा आपमान करणारं असल्याचं आहे." यावेळी त्यांनी बाबू गेणू यांनी ट्रक समोर दिलेल्या बलीदानाचा उल्लेख केला.

हेही वाचा: अभिनेत्री कंगना रनौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - शिवसेना

दरम्यान, यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर खुलासे केले. राज्यात सध्या निर्माण झालेल्या हिंसाचारावर देखील त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. आपल्या अल्पकालीन स्वार्थासाठी आपण दिर्घकालीन नुकसान करून घेतोय का, असा प्रश्न प्रत्येक नेत्यानं स्वत:ला विचारला पाहिजे असही ते म्हणाले.

loading image
go to top