"कंगनाचं ते वक्तव्य चुकीचं पण..."; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil

"कंगनाचं ते वक्तव्य चुकीचं पण..."; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

sakal_logo
By
सुधीर काकडे

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रानावत ही आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी नेहमी चर्चेत असते. कंगना रानावत आणि वादग्रस्त विधान हे जणू समीरकरणच तयार झालं आहे. अशातच कंगना रानावतने केलेल्या विधानावरून नवा वाद उभा राहीला आहे. भारताला १९४७ साली नाही तर २०१४ साली मिळालं असं वक्तव्य कंगना रानावतने (kangna ranaut) केलं आहे. त्यावर आता भाजपनेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

देशाला स्वतंत्र भीक म्हणून मिळाले आहे, १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले नसून, २०१४ साली मिळाले असल्याचं वक्तव्य कंगना रानावतने केलं आहे. त्यावरून कंगनाला सध्या मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागतोय. त्यातच भाजपनेते चंद्रकांत पाटील यांनी कंगना रानावतने केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना कंगनाचे विधान चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. "देशाच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल कंगना राणावतने केलेलं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं आहे. स्वातंत्र्य चळवळीवर नकारात्मक वक्तव्य करण्याचा कोणालाही अधिकार नाही," असे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

हेही वाचा: "मूठभर लोकं देशभक्त मुसलमानांना बदनाम करताय"

दरम्यान, पुढे बोलताना चंद्रकांत पाटील असंही म्हणाले की, कंगनाचे ते वक्तव्य चुकीचे आहे, पण बोलण्यामागचा हेतू आपल्याला माहिती नाही. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, सामान्य माणसाला खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव येत असल्यांचं वक्तव्य कंगनाने केलं होतं.

loading image
go to top