Kankavli: दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क; राणे पाच वाजता साधणार संवाद

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सध्या जिल्ह्यात ठाण मांडून आहेत.
Bank Election
Bank ElectionEsakal

कणकवली : जिल्हा बँक (Bank Election)निवडणुकीच्या संघर्षाचे केंद्र असलेल्या कणकवली (Kankavli)मतदार संघातील १६५ पैकी १०५ जणांनी दुपारपर्यंत मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये आमदार वैभव नाईक(Vaibhav Naik),जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत (Satish Savant), जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत (Ranjana Savant), पंचायत समितीचे सभापती मनोज रावराणे, नगरसेवक सुशांत नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, बेस्टचे माजी चेअरमन गौरीशंकर खोत यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. गर्दी पांगवण्यासाठी पोलीस वारंवार सूचना देत आहेत. जिल्हाभरातील बहुतांशी माध्यमांचे प्रतिनिधी हे कणकवलीतच आहेत. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीचे केंद्र असलेल्या कणकवली मतदार संघाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. बँकेसाठी १९ उमेदवार निवडून देण्यासाठी प्रत्येकाला सहा मताचा अधिकार आहे. कणकवली शेती संस्था मतदारसंघातून विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत हे उमेदवारी लढवत आहेत. दोन वेळा बिनविरोध आलेल्या सावंत यांना या खेपेस भाजप (BJP)पुरस्कृत पॅनेलने मोठी टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, सतीश सावंत यांच्या विरोधात खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष विठ्ठल देसाई हे रिंगणात आहेत. या मतदारसंघात ३६ मतदार असून सतीश सावंत यांच्याकडे २२ मतांची बेगमी असल्याचे सांगितले जात आहे. या मतदारसंघात विजयी होण्यासाठी १९ मतांची गरज आहे.

Bank Election
सतीश सावंतांच्या मोबाईलवर रिंग वाजताच मतदान केंद्रावर बाचाबाची

राणे पाच वाजता संवाद साधणार

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सध्या जिल्ह्यात ठाण मांडून आहेत. आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर अंतरिम निर्णय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आणि जिल्हा बँक निवडणूक विषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे सायंकाळी पाच वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेले शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांनी ही मतदानाचा हक्क बजावला आहे. गेल्या अठरा तारीखला त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. संतोष परब हे मजूर सहकारी संस्था मतदारसंघाचे उमेदवार आहेत. आज दुपारी 12 वाजता त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com