Thackeray vs Shinde: एकनाथ शिंदे दिशाभुल करण्यात पटाईत? याच जोरावर मिळवलं पक्षचिन्हं अन् नाव kapil Sibal argument is that Shinde misled the election commission and got shivsena name and symbol | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shinde Vs Thackeray

Thackeray vs Shinde: एकनाथ शिंदे दिशाभुल करण्यात पटाईत? याच जोरावर मिळवलं पक्षचिन्हं अन् नाव

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणीचा आजचा तिसरा दिवस आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जवळपास अडीच दिवस युक्तिवाद केला आहे. आजही सकाळी (23 फेब्रुवारी) कपिल सिब्बल युक्तिवादाने कामकाजाची सुरुवात झाली. आजही कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. आज त्यांनी राज्यपालांना लक्ष्य केलं. युक्तिवादाच्या दरम्यान सिब्बल यांनी तत्कालीन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या कार्यप्रणालीवरप्रश्नचिन्हं उपस्थित केलं.

यावेळी बोलताना कपिल सिब्बल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कशा प्रकारे शिवसेना हे पक्षाचे नाव आणि चिन्हं मिळवण्यासाठी दिशाभूल केल्याचं यावेळी कपिल सिब्बल यांनी सांगितलं आहे. फूट ही पक्षांतर्गत बाब आहे आणि याचिका 19 तारखेला दाखल केली गेली. ना समन्स, ना ठिकाण, ना वेळ काहीच नाही. अशी कुठं शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेची बैठक असते का? आम्ही जशी माहिती दिली, तसं त्यांनी काही केलं का? मिटिंग झाल्यानंतर आम्हाला त्यांच्या बैठकीचे मिनिट्स कळाले. याचिका 19 जुलैला आणि बैठकीच्या मिनिट्सवर 27 तारीख आहे. या दोन्ही गोष्टींची आयोगाकडे नोंद आहे. घटनात्मक संस्था असे निर्णय कसे घेऊ शकतात? असंही सिब्बल यावेळी म्हणाले आहेत.

तर पुढे बोलताना कपिल सिब्बल म्हणाले की, याचिका 19 जुलैची आहे. मात्र बैठकीचे तपशील 27 जुलैचे आहेत. तर याच तपशीलांच्या जोरावरच शिंदेंना पक्षचिन्हं आणि नाव मिळावलं असा दावा सिब्बल यांनी केला आहे. तर एकनाथ शिंदे यांनी आयोगाला दिशाभूल करणारी माहिती दिली असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला आहे.

तर युक्तिवाद संपवण्यापूर्वी कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरही बोट ठेवलं आहे. आयोगाने शिवसेना पक्षासंबंधी निर्णय घेताना जी कागदपत्र ग्राह्य धरण्यात आली, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. शिंदे गटाच्यावतीने १९ जुलै रोजी याचिका दाखल केली. मात्र त्यात २७ जुलैच्या बैठकांचे मुद्दे पुराव्यादाखल देण्यात आले आहेत. हे दोन्ही कागदपत्रे आयोगाकडे आहेत. १९ तारखेलाच त्यांना २७ तारखेच्या मीटिंगमध्ये काय होतंय, हे कसं माहिती असेल, असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे.

निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा केला, हे सिद्ध होतं आणि अंतिम निर्णय त्यांच्या बाजूने घेतला गेला, असा दावा शेवटी ठाकरे गटाचे जेष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केला आहे.