Eknath Shinde: मी तसला मुख्यमंत्री नाही; निधीवरुन CM शिंदे स्पष्टच बोलले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde

Eknath Shinde: मी तसला मुख्यमंत्री नाही; निधीवरुन CM शिंदे स्पष्टच बोलले

कराडः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळी जावून अभिवादन केले. कराड येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधून या परिसरातील विकासकामांबद्दल माहिती दिली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणं, हा सरकारचा मानस आहे. या भागातील शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेले आहेत. त्यामुळे कृषी विभाग आणि शेतकरी कौतुकास पात्र ठरलेले आहेत.

यावेळी मुख्यमंत्र्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाविषयी विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी ८ कोटी रुपयांचा निधी मी इथे येण्यापूर्वी दिला आहे. इथे येऊन घोषणा करायची आणि नंतर विसरुन जायचं, तसा मुख्यमंत्री मी नाही.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

विकासामध्ये कधीही दुजाभाव होणार नाही. कराड विमानतळाचे विस्तारीकरण होणार आहे. त्यामुळे इथे नाईट लँडिंग होईल. ऊसावर रिसर्च करणारं सेंटर उभा करणार असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. आमचं सरकार हे झटपट निर्णय घेणारं सरकार आहे. त्यामुळे प्रत्येक कॅबिनेट बैठकीत एकतरी जलसिंचन प्रकल्पांना आम्ही मंजुरी देतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा: Covid-19: नाकाद्वारे मिळणार कोरोनाची लस; भारत बायोटेकच्या 'वॅक्सिन'ला मंजुरी

यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी आज त्यांच्या स्मृतीस्थळावर जावून अभिवादन केले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार अनिल बाबर, बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज चव्हाण, जयकुमार गोरे, नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.