esakal | कर्जत तालुक्यातील कळंब येथील बडोदा बँकेच्या शाखेला आग | Baroda Bank
sakal

बोलून बातमी शोधा

Fire

कर्जत तालुक्यातील कळंब येथील बडोदा बँकेच्या शाखेला आग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नेरळ: कर्जत (karjat) तालुक्यातील कर्जत-मुरबाड राज्यमार्गावरील कळंब गावातील बडोदा बँकेच्या (baroda bank fire) शाखेत आज सायंकाळी आगीचा भडका उडाला. सुमारे २५ हजार खातेदार असलेली ही बँक आगीत खाक झाली. यात महत्त्वाची कागदपत्रे (documents) आणि एटीएम सेंटरचेही (ATM) मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते. अग्निशमन दल (fire brigade) पावणेआठच्या सुमारास घटनास्थळी पोहचली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

हेही वाचा: दिल्लीसमोर महाराष्ट्र कधीही झुकणार नाही - सुप्रिया सुळे

कर्जत-मुरबाड राज्यमार्ग रस्त्यावर कळंब हे गाव आहे. येथे देना बँक ही एकमेव बँक होती. त्या बँकेचे विलीनीकरण नुकतेच बडोदा बँकेत झाले. मुख्य रस्त्याच्या बाजूला या बँकेची शाखा आहे. आज ८ सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी बँकेच्या शाखेला आग लागल्याचे स्थानिकांनी पाहिले. बँकेचे कर्मचारी शाखा बंद करून तेथून निघून गेले होते. सर्वप्रथम बँकेचे एटीएम सेंटरच्या आतमधून धूर येताना दिसला आणि आग पुढे वाढत गेली.

त्यात स्थानिकांनी तत्काळ कर्जत येथे पालिकेच्या अग्निशमन दलाला कळविले. त्यावेळी पाऊस सुरू असल्याने आग आणखी वाढत होती. स्थानिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीने रौद्ररूप धारण केले. त्यात पोलिसांचा संपर्क आग लागल्यापासून पुढील अर्धा तास नव्हता. त्यामुळे स्थानिकांनी प्रयत्न करून महावितरणला आगीमुळे आणखी शॉर्टसर्किट होऊ नये यासाठी वीजपुरवठा बंद करण्यास सांगितले.

६ वाजून ४० मिनिटांनी कर्जत येथील अग्निशमन दलाला आगीबद्दल फोनवरून कळविले; मात्र अग्निशमन बंब तेथे पोहचायला तब्बल पावणेआठ वाजले. त्या वेळेपर्यंत संपूर्ण बँकेची शाखा जळून खाक झाली. बडोदा बँकेचे एटीएम सेंटर, बँकेच्या शाखेतील सर्व महत्त्वाची कागदपत्रे आणि दस्तावेज जळून खाक झाले. या शाखेचे २५ हजार खातेदार आहेत.

"आग लागल्यापासून जवळपास सव्वा तासाने अग्निशमनची गाडी कळंब येथे पोहचली. तसे पाहिले तर कर्जतपासून कळंब हे अंतर रस्ता सुस्थितीत असल्याने अर्धा तासात पार करता येते. तरीही प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे बँकेचे मोठे नुकसान झाले."
- शहनवाज लोगडे, स्थानिक

loading image
go to top