esakal | कर्जत: तबेला कामगाराच्या खुनाचे गूढ उकलले | murder case
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

कर्जत: तबेला कामगाराच्या खुनाचे गूढ उकलले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नेरळ, : कर्जत (karjat) तालुक्यातील सावेळे येथील एका तब्येल्यात काम करणाऱ्या गणपत जाधव (ganpat jadhav) या ७५ वर्षाच्या वृद्धाच्या खुनाचे (Murder) गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. जाधव हे सांगितलेले काम करत नव्हते, वारंवार उलट बोलायचे म्हणून तबेला मालकानेच त्यांचा खून केला होता. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली होती.

हेही वाचा: नालासोपारा: आजार बरा करण्याच्या नावाखाली ढोंगीबाबाचा तरुणीवर अत्याचार

सावेळे गावात आरिफ मुल्ला याचा तबेला आहे. या ठिकाणी गणपत हे काम करत होते. त्यांचा खून झाल्यानंतर आरिफ याने चार जणांनी तबेल्यात घुसून दोघांना मारहाण केली. यावेळी गणपत यांनी आरडाओरडा केल्याने हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात हत्याराने वार केल्याचे पोलिसांना जबाबात सांगितले होते. या प्रकरणात कर्जत तालुक्यातील शिवसेनेच्या एका प्रमुख कार्यकर्त्याचे नाव पुढे आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. मात्र पोलिसांनी आरिफ याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने हा खून आपणच केला, असे कबूल केले.

गणपत हे सांगितलेले काम ऐकत नव्हते. नेहमी उलट बोलायचे. त्यामुळे त्याचा राग मनात ठेवून त्यांच्या डोक्यात फावड्याचा घाव घालून खून केला. त्यानंतर त्यांना उचलून नेहमी झोपत असलेल्या ठिकाणी आणून ठेवले. स्वतःच्या डोक्यातही फावड्याचा घाव घालून अनोळखी व्यक्तींनी हल्ला केला असल्याचा बनाव केला, असे पोलिसांना सांगितले.
कर्जत ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी तपास पूर्ण केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे, खालापूर ठाण्याचे निरीक्षक विभुते आदींच्या वेगवेगळ्या पथकांनी या घटनेचा तपासासाठी मदत केली.

...आणि बनाव अंगाशी आला

आरिफ याने ज्या फावड्याने गणपत यांच्यावर हल्ला केला, त्या फावड्याने त्याने तबेल्यातील शेण काढले होते. त्यामुळे पोलिसांनी आणलेल्या श्वान पथकाला सुगावा लागला नव्हता. तसेच आरिफ याने स्वतःला वाचविण्यासाठी बाबू घारे आणि रमेश झगडे या दोन व्यक्तींवर खून प्रकरणात संशय व्यक्त केला होता. बाबू घारे यांच्याबरोबर तबेल्याच्या गुरचरण जागेवरून वाद होता; तर झगडे यांच्याकडून त्याने तीन लाख उसने घेतले होते; मात्र त्याने केलेला बनाव त्याच्याच अंगाशी आला. पोलिसांनी आरिफला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.

loading image
go to top