esakal | नालासोपारा: आजार बरा करण्याच्या नावाखाली ढोंगीबाबाचा तरुणीवर अत्याचार | woman molestation
sakal

बोलून बातमी शोधा

woman Molestation

नालासोपारा: आजार बरा करण्याच्या नावाखाली ढोंगीबाबाचा तरुणीवर अत्याचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा : आजार बरा करतो म्हणून पाच मुलांच्या ढोंगीबाबाने (Fake saint) पीडितेला वासंनाधतेची शिकार बनवले. तिचे धर्मपरिवर्तन करून तिच्याशी लग्नही (marriage) केले. तिच्यावर जळपास दीड वर्ष अत्याचार (woman molestation) केला. पीडितेच्या घरच्यांना हा ढोंगीबाबा आपल्या चालकाला तिचा पती म्हणून पुढे करायचा; मात्र पीडितेच्या मोठ्या बहिणीने एका सामाजिक कार्यकर्त्याला गाठून बाबाचे पितळ उघडे केले आहे. नालासोपारा पूर्वेच्या तुळिंज पोलीस ठाण्यात या बाबावर, बाबाला मदत करणाऱ्या त्याच्या पत्नीवर तसेच त्याचा सहकारी चालकावर गुन्हा दाखल (police complaint) केला आहे; मात्र पोलिसांनी आतापर्यंत बाबालाच अटक (culprit arrested) केली आहे.

हेही वाचा: कळंबोली भागातून २ बाल कामगारांची सुटका

झाडपाला आणि मंत्राने मंतरलेल्या ताविजने आपण लोकांना बरे करतो, असा कांगावा करून तो लोकांना फसवायचा. अशा ढोंगीबाबाची शिकार उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे राहणारी एक २३ वर्षीय युवती झाली. पीडित युवतीची बहीण मिरा रोड येथे राहते. तिची तब्येत बरी नसल्याने तिने या बाबाचे झाडपाल्याचे औषध आणि मंतरेलेले ताविज घेतले आणि तिला बरे वाटले, असे तिचे म्हणणे आहे. तिने आपल्या वारणसीला राहणाऱ्या बहिणीला अशीच तब्येत खराब राहत असल्याने बाबाचा नंबर दिला. बाबा आणि तिच्या पत्नीने आपल्या बोलण्यात फसवून पीडित तरुणीला उपचारासाठी नालासोपारा येथे यावे लागेल, असे सांगितले.

तिला चक्क विमानाची तिकिटेही पाठवून दिली. बाबा, बाबाची पत्नी आणि चालक स्वतः तिला घ्यायाला विमानतळावरही गेले. पीडित २६ जून २०२० ला नालासोपारा येथे बाबाच्या घरी आली; मात्र बाबाने आपली वेगळीच नियत तिला दाखवली. बाबा, बाबाची पत्नी, चालक आणि बाबाची पाच मुले अशी एकाच रूममध्ये राहू लागली. बाबा पीडितेला उपचाराच्या नावाखाली गुंगीचे औषध द्यायचा आणि तिच्यावर अत्याचार करायचा. पीडितेने ही बाब बाबाच्या पत्नीला सांगितल्यावर पत्नीने पीडितेलाच धमकी दिली. पीडितेच्या घरच्यांना बाबाने मुलीने माझ्या ड्रायव्हरबरोबर लग्न केले असून, ती खूश असल्याच खोटे सांगितले होते.

ढोंगीबाबाने पीडितेचे धर्मपरिवर्तन केले. त्यानंतर तिच्याबरोबर लग्नही केले; मात्र पीडितेच्या घरच्यांना आपल्या ड्रायव्हरने लग्न केले असल्याचे सांगायचा. आई आजारी असल्याचे सांगून पीडितेने वाराणसी गाठली आणि आपल्या मिरा रोड येथील बहिणीला सगळा प्रकार सांगितला. पीडितेच्या बहिणीने मिरा रोड येथील एनजीओना गाठून सर्व प्रकार सांगितल्यावर हा सर्व प्रकार उघड झाल्याचे संभाजी सेना महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजया फर्नांडिस यांनी सांगितले.

loading image
go to top