सीमाभागात आयोजित केल्या जाणाऱ्या आंदोलनात महाराष्ट्रातील नेते मंडळी सहभागी होऊ नये, यासाठी दरवर्षी बंदीचा आदेश जाहीर केला जातो.
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे (Maharashtra Ekikaran Samiti) आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेते (Political leaders Maharashtra) मंडळी उपस्थित राहू नये, यासाठी बाहेरून येणाऱ्याना बंदी घालण्यात आली आहे. तसेच नऊ डिसेंबर रोजी शिनोळी व इतर सीमानाक्यांवर चोख बंदोबस्त ठेवून अटकाव केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहमद रोशन (Collector Mohammad Roshan) यांनी दिली आहे.