Elon Musk Jayant Patil
Elon Musk Jayant PatilSakal

Karnataka Border Dispute : 'करेक्ट कार्यक्रम' करून जा; जयंत पाटलांनी इलॉन मस्कलाच वादात ओढलं

'तो मी नव्हेच' म्हणणाऱ्या बोम्मईंबद्दल जयंत पाटलांची थेट मस्ककडेच विचारणा
Published on

मी पदावरुन पायउतार होऊ का, असा सवाल ट्विटरचा मालक इलॉन मस्कने विचारला आहे. पण राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी त्याला थेट महाराष्ट्र कर्नाटक सीमावादातच ओढलं आहे.

कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादाचा मुद्दा सध्या चांगलाच तापलेला आहे. अशातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून महाराष्ट्राबद्दल चिथावणीखोर ट्वीट्स केली जात आहेत. हे ट्वीट आपण केलेली नाहीत, अकाऊंट हॅक केलं आहे, अशी कारणं देत बोम्मईंकडून सारवासारव केली जात आहे.

Elon Musk Jayant Patil
Eknath Shinde : 'बोम्मई यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन कोणी ट्विट केली याची माहिती मिळाली'

त्यामुळे आता नक्की ट्वीट कोणी केली आहेत, हे आता तुम्हीच सांगा, असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी थेट ट्विटरचा मालक इलॉन मस्कलाच केली आहे.

मी ट्वीटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा द्यावा का? असा प्रश्न इलॉन मस्कने ट्वीटर पोलच्या आधारे विचारला आहे. ह्याच पोलला रिट्वीट करत जयंत पाटलांनी त्याला एक प्रश्न विचारला आहे.

पाटील ट्वीटमध्ये म्हणतात, "कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. इलॉन मस्क आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून वरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, हे ट्विट नक्की कोणी केले आहे ?

आता या ट्वीटला इलॉन मस्क खरंच उत्तर देतोय, की त्या आधीच नक्की ट्वीट कोणी केले हा प्रश्न सुटतोय, हे पाहण्यासारखं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com