कर्नाटक : पक्षात ‘आणलेल्या’ मंत्र्यांना वगळणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

कर्नाटक : पक्षात ‘आणलेल्या’ मंत्र्यांना वगळणार?

बंगळूर : गेल्या आठवड्यात होस्पेटमध्ये झालेल्या भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीनंतर भाजपमध्ये सावध हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षात ‘आणलेल्या’ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप हायकमांडने सावध भूमिका घेतली. वगळण्यात येण्याची शक्यता असलेले काही ‘पक्षांतरित’ मंत्री पुन्हा स्वगृही जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

के. एस. ईश्‍वराप्पा यांच्या राजीनाम्यानंतर सध्या मंत्रिमंडळात पाच पदे रिक्त आहेत. मंत्रिमंडळात १० नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी चार किंवा पाच विद्यमान मंत्र्यांना वगळले जाण्याची शक्यता आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते मात्र सावध पावले टाकत आहेत. काही ‘पक्षांतरित’ मंत्र्यांना काढून टाकण्याच्या सूचनेमुळे ते काँग्रेसच्या संपर्कात आहेत. भाजपला सत्तेत येण्यास मदत करण्यासाठी त्यांनी २०१९ मध्ये ज्या पक्षाचा राजीनामा दिला होता, त्याच पक्षाच्या ते आता संपर्कात असल्याची चर्चा आहे.

राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याच्या अडचणींवर चर्चा झाली. श्रीमंत पाटील, आर. शंकर आणि महेश कुमठळ्ळी या ‘कमी प्रभावी’ मानल्या गेलेल्या नेत्यांची उदाहरणे देऊन पक्षाचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही, असे काही नेत्यांचे मत आहे. इतर ‘स्थलांतरित’ मंत्र्यांना काढून टाकणे धोकादायक ठरू शकते.गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिल्लीतील पक्षाच्या उच्चपदस्थांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराला अंतिम रूप दिले जाईल, असे वक्तव्य केल्याने माजी मंत्री रमेश जारकीहोळी आणि सी. पी. योगेश्वर यांच्यासह अनेकांच्या आशा वाढल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच...

नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी किती विद्यमान मंत्र्यांना कमी करायचे, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, या वर्षी मेपर्यंत मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा असलेल्या इच्छुकांच्या आशा वाढल्या आहेत. बोम्मई यांनी काल (ता. १९) पत्रकारांना सांगितले, की ‘हायकमांड’चा फोन आल्यावर मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला भेट देतील.

Web Title: Karnataka Cabinet Expansion Bjp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top