Karnataka: महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न वाद सुरू असतानाच कर्नाटकची नवी कुरापत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka Cm Basavaraj Bommai

Karnataka: महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न वाद सुरू असतानाच कर्नाटकची नवी कुरापत

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. महाराष्ट्र सरकारने सीमप्रश्नी बैठक घेतली. यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेणार आहे. अशातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा केला आहे. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. (Karnataka Cm Basavaraj Bommai On Jat Sangli Maharashtra Karnataka Border)

पत्रकार परिषदेत बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद आणखी नवा वाद उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा करण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचे त्यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले.

‘‘आमचे सरकार महाराष्ट्रातील कन्नड-माध्यमांच्या शाळांना अनुदान देईल आणि शेजारच्या राज्यात राहणाऱ्या कन्नडिग स्वातंत्र्यसैनिकांना निवृत्तीवेतनही देईल. त्यासाठी आम्ही आवश्यक कागदपत्रे गोळा करत आहोत. आम्ही जत तालुक्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. असेही त्यांनी सांगितले.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्राला चॅलेंज

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. महाराष्ट्र सरकारने सीमप्रश्नी बैठक घेतल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आक्रमक झाले आहेत. सुप्रीम कोर्टात आमची बाजू मांडण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार असल्याचे सांगत बोम्मई यांनी थेट महाराष्ट्रातील भाजप सरकारला आव्हान दिले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य अतिथीगृह सह्याद्री येथे उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र राज्य शासनाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची कर्नाटक सीमा वाद प्रकरणी कायदेशीर लढाई प्रक्रियेत समन्वय साधण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हे विधान केले आहे.

टॅग्स :Karnataka