Karnataka Election 2023: फडणवीस निकालाने खुश! म्हणाले पवारांच्या उमेदवाराला पॅक करून पुन्हा पाठवलं

bjp
bjpesakal

कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीदरम्यान मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यात काँग्रेस सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्नाटकमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला पराभवाचे तोंड पहावे लागले आहे.

काँग्रेस १३५ पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. तर भाजप ६५, जेडीएस २० आणि इतर ०४ जागांवर आघाडीवर आहेत. हे असताना देवेंद्र फडणवीस यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील पराभूत झाले आहेत. ते निपाणी मधून लढत होते.

bjp
Karnataka Election 2023 : "स्वत:चं घर जळालं ते आधी वाचवा" ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला!

या पराभवावरून त्यांनी शरद पवारांवर निशाना साधला ते म्हणाले, शरद पवारांच्या पक्षाला एक टक्क्या पेक्षा देखील कमी मतं मिळाली आहेत, मी तेथील लोकांना सांगितलं होत की राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पॅक करून पुन्हा पाठवून द्या, आणि माझं निपाणीच्या लोकांनी ऐकलं, पवारांचा उमेदवार पॅक करून पुन्हा पाठवला" अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.

bjp
Karnataka Election Result : पवारांच्या उमेदवाराला कात्रजचा घाट दाखवणाऱ्या शशिकला जोल्ले आहेत तरी कोण?

हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, ...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निपाणीत सभा घेतली होती. त्या ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होत. हा राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय डोंबलं करणार? इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिलगीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचे बघतो. काँग्रेसला आता राहिलेच नाही अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणीस यांनी हल्लाबोल केला होता. Karnataka Election Result

त्याचवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार हे उत्तमराव पाटील यांच्यासाठी मैदानात उतरले होते. त्या ठिकाणी सभा घेत पवारांन फडणवीसांना सडेतोड उत्तर दिले होते. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी मतदानादरम्यान निपाणीत तळ ठोकला हेाता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com