Almatti Dam : 'आलमट्टी'तून फक्त 15 हजार क्युसेक विसर्ग; महाराष्ट्राला मोठा फटका, जाणून घ्या कारण

आलमट्टी धरणातून (Almatti Dam) फक्त १४,६९० क्सुसेक इतका विसर्ग करण्यात आला आहे.
Almatti Dam
Almatti Damsakal
Summary

विसर्ग कमी असल्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. याचा फटका महाराष्ट्राला बसत आहे.

बेळगाव : आलमट्टी धरणातून (Almatti Dam) फक्त १४,६९० क्सुसेक इतका विसर्ग करण्यात आला आहे. तर धरणात एक लाख ३८ हजार ४७३ क्सुसेक इतकी आवक होत आहे. यामुळे आलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवावा, अशी मागणी महाराष्ट्रातून केली जात आहे.

हा विसर्ग कमी असल्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. याचा फटका महाराष्ट्राला बसत आहे. कर्नाटक पाटबंधारे खात्याकडून (Karnataka Irrigation Department) मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. २६) आलमट्टी धरणातील एकूण पाणीसाठा ८२.५०९ टीएमसी इतका होता. तर जिवंत पाणीसाठा ६४.८८९ टीएमसी इतका होता.

Almatti Dam
Koyna Dam Update: महापुराची धास्ती! महाराष्ट्राचं 'आलमट्टी'वर तर कर्नाटक शासनाचं 'कोयने'वर लक्ष्य; दोन्ही धरणांत किती आहे साठा?

या धरणातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे महाराष्ट्राच्या चिंतेत वाढ झाली आहे. यामुळे विसर्ग वाढविण्याची मागणी वारंवार केली जात आहे. मंगळवारी (ता. २५) धरणातील विसर्ग ८ हजार ८५७ क्सुसेक इतका होता. यात वाढ करून गुरुवारी १४,६९० क्सुसेक इतका विसर्ग करण्यात आला आहे.

Almatti Dam
Monsoon Latest Live Update : मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंदुधुर्ग, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट

तसेच बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी जलाशयाची पातळी २४७४.७५ फूट इतकी होती. धरणाचे दोन दरवाजे प्रत्येकी ७ इंचाने खुले केले आहेत.

बुधवारी दिवसभर पाऊस कमी होता. धरणातील आवक कमी झाल्यानंतर दरवाजे बंद केले जाणार आहेत. दोन दिवसांत पाण्याची आवक अधिक झाल्यामुळे मार्कंडेय नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Almatti Dam
Koyna Dam Update : कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृह केंद्राचा दरवाजा आज उघडणार; नदीकाठच्या गावांना इशारा

हिडकल लवकरच भरणार

हिडकल धरणाची क्षमता ५१ टीएमसी आहे. हे धरण बुधवारी निम्मे भरले. या धरणात २६.४९८ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. तसेच गतवर्षी २६ रोजी ३४ टीएमसी पाणी होते. या धरणात ३३,२५० क्सुसेक इतकी आवक आहे. पाण्याची आवक वाढतच राहिल्यास हे जलाशयही लवकर भरण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com