
कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या बसवर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत काळं फासल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नव्हे, तर या बसच्या चालकाला मारहाण करून त्याला जबरदस्तीने ‘कन्नड भाषा येते का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. ही घटना पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर घडली असून, त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.