
Karuna Munde News : धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करा, अन्यथा…; करुणा मुंडेंचं CM शिंदेंना पत्र
Dhananjay Munde News: राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी करुणा मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर बनावट व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे. तसेच धनंजय मुंडे यांचे किती मुलींसोबत संबंध आहेत, याचा देखील लवकर पर्दाफाश करणार असल्याचे करुणा मुंडे म्हणाल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहीलेल्या पत्रात करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनी आजपर्यंत मला फसवण्यासाठी किती प्रयत्न केले. पोलिसांसमोर गाडीत रिवॉव्हर ठेवले.
मला माझ्या मुलांपासून सहा महिने दूरही ठेवले. माझ्यावरती जीवघेणे हल्ले झाले, सहा खोट्या केसेस केल्या. षडयंत्र रचण्यासाठी वेगवेगळे लोक पाठवून माझी आर्थिक फसवणूक केली. तरीही मी हरली नाही, माझी त्यांच्यासोबतची लढाई अद्यापही सुरूच आहे, असे या पत्रात म्हटले आहे.
मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटल्यानंतर माझे बनावट व्हिडीओ व्हायरल केले. आता रोज मला धमक्या दिल्या जात आहेत. मानसिक त्रात दिल्या जातोय. त्यामुळे मी माझ्या स्वखर्चाने धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट करण्याची विनंती करत आहे.
धनंजय मुंडे आणि मी किती खरी आणि किती खोटे आहोत, याचे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असेही करुणा मुंडे म्हणाल्या आहेत.
या सगळ्याची तक्रार डीजीपी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य महिला आयोगाकडे केल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. मात्र यावर काहीच कारवाऊ झाली नाही.
राज्य महिला आयोगाने देखील दखल घेतली नाही त्यामुळे रुपाली चाकणकर यांना पदावरून हटवा अशी मागणी राष्ट्रीय महिली आयोगाकडे करणार असल्याचे करुणा मुडे म्हणाल्या आहेत.
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास आणि रुपाली चाकणकरांना पादावरून काढून न टाकल्यास मंत्रालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा देखील करुणा मुंडे यांनी यावेळी दिला आहे.