
कसारा रेल्वे स्थानकात टीसीकडून ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आईने उपमुख्यमंत्र्यासह रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली. टीसीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून रेल्वे पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. टीसीने तिकिट पाहण्याच्या बहाण्यानेआईसमोरच चिमुकलीचा विनयभंग केला.