
पाली : भाताचे कोठार असणाऱ्या रायगड जिल्ह्यात भात शेतीचे क्षेत्र घटत आहे. दुसरीकडे या शाश्वत रोजगारात घट झाल्याने रोजगारासाठी राज्यात-परराज्यात होणारे स्थलांतर वाढत आहे. मात्र सुधागड तालुक्यातील चिखलगाव आदिवासी वाडीतील ‘भवानी बचत गटाच्या’ महिला स्थलांतर थांबवण्यासाठी व आयुष्यभराच्या मजुरीच्या चक्रातून बाहेर पडण्याची धडपड करत स्वतः भातशेती करण्यासाठी पुढे आल्या आहेत. शनिवारी (ता. 19) या महिलांनी मिळून भात लावणी केली. यावेळी कृषी अधिकारी देखील शेतात उतरले होते.