महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या राजकीय पक्षाची एंट्री; काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पहिली जाहीर सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Rashtra Samithi

महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या राजकीय पक्षाची एंट्री; काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पहिली जाहीर सभा

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या पक्षाने महाराष्ट्रात एंट्री केली आहे. तेलंगानाच्या लगत असलेला आणि काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या नांदेडमध्ये पक्ष वाढीचा शुभारंभ केला आहे. आज केसीआर यांनी नांदेडमध्ये जाहीर सभा घेतली या सभेला मोठ्या संख्येने लोकांनी पाठिंबा दर्शवला.

यावेळी केसीआर यांनी 'अब कि बार किसान सरकार' अशी घोषणा दिली आहे. सभेत बोलताना त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर जोरदार टीका केली. शेतकरी आत्महत्या, पाणी प्रश्न अशा विविध प्रश्नांवर त्यांनी भाष्य केलं.

तर त्यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे टीका केली, ते म्हणाले मागील ७० वर्षात सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणतीच कामे केली नाहीत. आत्ता पर्यंत सगळे आमदार-खासदार झाले पण आता शेतकऱ्याला पुढे यावं लागेल.

देशामध्ये आज परिवर्तनाची गरज असून शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या ह्या महाराष्ट्रात होत असल्याचं केसीआर यांनी यावेळी सांगितलं. देशाला स्वतंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी देखील अजून पर्यंत देशातील अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी मिळत नाही.

शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा नाहीत. तर त्यांनी पुढील काळात महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात, गावात जाऊन पक्षाचा प्रचार प्रसार करणार असल्याचे सांगितले. तर शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी म्हणजे शिवनेरीवर जाऊन शपथ घेऊन पक्षवाढीसाठी सुरूवात करणार असल्याची माहिती चंद्रशेखर राव यांनी दिली.