
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी निशाणा साधलाय. सगळे माहिती असून जर २५ वर्षे तुम्ही गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी, दिघेसाहेबांशी सर्वांत मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे. सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल, असे त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.
‘‘धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबत आम्ही फक्त चित्रपट काढत त्यांनी काय काम केले आहे एवढेच दाखविले आहे, पण त्यांच्याबाबत जी घटना घडली आहे, तिचा मी साक्षीदार आहे, वेळ आल्यावर मी त्याच्यावर भाष्य करणार आहे. मी मुलाखत दिली तर राज्यात नव्हे तर देशात भूकंप होईल,’’ असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले होते. अन्यायाविरोधात पेटून उठा, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे, मी आज काही बोलणार नाही, पण समोरून जसजसे तोंड उघडले जाईल तसे मलाही बोलावे लागेल असा गर्भित इशाराही त्यांनी दिला. मालेगाव येथे नाशिक विभागीय आढावा बैठकीनिमित्त दौऱ्यावर असलेल्या शिंदे यांनी बैठकीनंतर झालेल्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली होती.
शिंदेंच्या या टीकेवर केदार दिघेंनी प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, "मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, आनंद दिघेंबाबत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार आहे... मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात? सगळे माहिती असून जर २५ वर्षे तुम्ही गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी, दिघेसाहेबांशी सर्वांत मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे. सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल".
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठी माणसाचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही असे सांगत राज्यपालांनी बोलताना भान ठेवावे, मुंबईबाबत त्यांनी मांडलेल्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही असे स्पष्ट केले. शिवसेना आम्ही वाचविली. भाजपशी युती असताना तुम्ही कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला. सत्तेसाठी युती तुम्ही केली. मी शांत आहे. त्याचा गैरअर्थ काढू नका. मी वेळ आल्यावर नक्की बोलेल, असं त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.