Ketaki Chitale | Epilepsy ची जनजागृती करणारी केतकी पवारांच्या आजारपणाची खिल्ली उडवते; नेटकरी संतप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ketaki Chitale
Epilepsy ची जनजागृती करणारी केतकी पवारांच्या आजारपणाची खिल्ली उडवते; नेटकरी संतप्त

Epilepsy ची जनजागृती करणारी केतकी पवारांच्या आजारपणाची खिल्ली उडवते; नेटकरी संतप्त

अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketaki Chitale) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. आता पुन्हा एकदा तिच्या एका वादग्रस्त पोस्टची चर्चा आहे. या पोस्टमध्ये तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी आक्षेपार्ह विधानं केली आहेत. यामुळे आता ती चांगलीच अडचणीत सापडली असून पुणे आणि कळवा पोलिसांत तिच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे. नेटिझन्सकडूनही तिच्या या पोस्टवरून संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: केतकी चितळे पुन्हा बरळली; शरद पवारांविषयी केली आक्षेपार्ह पोस्ट

केतकीने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून नितीन भावे नामक एका व्यक्तीची पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये शरद पवारांवर आजारपणावरून टीका केली असल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. नेत्यावर टीका करणं ठीक आहे, पण एखाद्याच्या आजारपणावरून त्याची खिल्ली उडवणं हे चुकीचं आहे, अशा आशयाच्या कमेंट्स सोशल मीडियावरून होत आहे. आपण स्वतः आजारी असताना दुसऱ्याच्या आजारपणाची टर उडवणं चुकीचं असल्याच्या प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्या आहेत.

हेही वाचा: शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकी चितळेवर गुन्हा दाखल

केतकी चितळेला कोणता आजार आहे?

अभिनेत्री केतकी चितळे सध्या एपिलेप्सी (Epilepsy) या आजारासाठी उपचार घेत आहे. फीट येणं, आकडी, मिरगी येणं अशी लक्षणं या आजाराची आहेत. केतकी सातत्याने या आजाराबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करत असते. तिने उपचारादरम्यानचे अनेक फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी Accept Epilepsy या नावाने तिने एक सोशल मीडिया पेजसुद्धा (Ketaki Chitale Social media page) सुरू केलं आहे.

Web Title: Ketaki Chitale Social Media Post About Sharad Pawar Fighting With Epilepsy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top