खडसेंना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधानही व्हायला आवडेल : महाजन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

''खडसेसाहेब ज्येष्ठ आहेत. त्यांना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान व्हायला आवडेल. पण पक्षाला तसं वाटायला पाहिजे. पक्षाला जे वाटत तेच महत्वाचे आहे''.

- गिरीश महाजन, पालकमंत्री, जळगाव

जळगाव : ''खडसेसाहेब ज्येष्ठ आहेत. त्यांना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधानही व्हायला आवडेल. मात्र, पक्षाला तसं वाटायला पाहिजे. पक्षाला जे वाटत तेच महत्वाचे आहे'', अशा शब्दांत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

नियोजन बैठकीसाठी महाजन जळगाव येथे आले होते. ज्येष्ठत्वानुसार मी मुख्यमंत्री व्हायला हवं होतं, अशी खदखद खडसे यांनी काल (शनिवार) व्यक्त केली होती. त्यांच्या वक्तव्यावरून महाजन म्हणाले, ''खडसेसाहेब ज्येष्ठ आहेत. त्यांना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान व्हायला आवडेल. पण पक्षाला तसं वाटायला पाहिजे. पक्षाला जे वाटत तेच महत्वाचे आहे''.

काय म्हणाले होते एकनाथ खडसे - 

सोशल, प्रिंट आणि इलेक्‍ट्रॉनिक मीडियावर खडसे आणि महाजन गटामध्ये चुरस असल्याचे दाखविले जाते. आमच्यात असे कोणतेही गट-तट नाही आणि असले तर त्या सर्वांचा मीच नेता आहे. पक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केला तर मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे. मात्र, पक्षाच्या आदेशाने चालावे लागत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khadse would like to be the Prime Minister says Giriish Mahajan