Khalapur Irshalwadi Landslide: माळीण घटनेनंतर आढावा घेतला होता पण...इर्शाळवाडी घटनेनंतर अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये

Khalapur Irshalwadi Landslide
Khalapur Irshalwadi Landslide
Updated on

Khalapur Irshalwadi Landslide : रायगडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याच्या बातम्या पण समोर आल्या होत्या. यादरम्यान खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी या गावात एक मोठी दुर्घटना घडली आहे. या इर्शाळवाडी वस्तीवर रात्री दरड कोसळली.

इर्शालवाडी परिसरात गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ बचाव व मदतकार्य सुरु केले. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच मंत्रालयात जावून आपत्कालिन नियंत्रण कक्षाची सूत्रे स्विकारत, बचाव व मदतकार्याचे संनियंत्रण केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार नियंत्रण कक्षातून दुर्घटनास्थळावर उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना बचाव, मदतकार्यासाठी हेलिकॉप्टरसह आदी यंत्रणा तात्काळ उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही पूर्ण केली. दुर्घटनास्थळी उपस्थित मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून त्यांनाही नियंत्रण कक्षास प्राप्त झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

Khalapur Irshalwadi Landslide
Khalapur Irshalwadi Landslide : मित्रांसोबत शाळेत झोपलो होतो अन् मोठ्ठा आवाज झाला...; दुर्घटनेतून बचावलेल्या तरुणांनी सांगितला थरारक अनुभव

दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त, मृत्यु पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

दरम्यान, इर्शालवाडी परिसरात घडलेल्या या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून ही दुर्घटना मन पिळवटून टाकणारी, विषण्ण करणारी असल्याचे म्हटले आहे. बचाव पथकानं अनेकांना ढिगाऱ्याबाहेर काढून त्यांचा जीव वाचवला आहे, परंतू काही नागरिक अजूनही ढिगाऱ्याखाली असून त्यांनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जखमी नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आवश्यक वैद्यकीय उपचार केले जात आहेत. सर्व जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या बांधवांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली असून त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करणार आहे यांची माहिती दिली. यादरम्यान अजित पवार मीडियाशी बोलताना म्हणाले की, माळीण घटनेनंतर भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्थानकडूव आढावा घेतला, त्यात हा भाग नव्हता. सदर ठिकाण हे दुर्गम असून संपूर्ण प्रशासन अलर्टवर आहे. यादम्यान हवामान खात्याचे अलर्ट बदलत आहेत, आता दर ३ तासांनी अपडेट येणार आहेत. उद्या पुणे सातारा रत्नागिरी रायगड हे अलर्टवर आहेत. ही जी घटना घडली त्यामुळे लोक घाबरले आहेत. आम्ही नियंत्रण कक्षेतून राज्याचा आढावा घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com