esakal | खामगाव कोरोना संशयित महिलेचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Khamgaon Corona suspected woman death

बुलडाणा जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा गुरुवारी 17 झाला आहे. वाढते रुग्ण जिल्हा वासियांच्या चिंतेत भर घालणारे आहेत. खामगाव तालुक्यातील चितोडा गावात दोन रुग्णआढळून आज कोरोना संशयित वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे, मात्र अद्याप सदर महिलेच्या टेस्ट बाबत रिपोर्ट आला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली आहे. दरम्यान आता नागरिकांनी आता अधीक जागरूक राहण्याची व काळजी घेण्याची गरज आहे

खामगाव कोरोना संशयित महिलेचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खामगाव:  बुलडाणा जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा गुरुवारी 17 झाला आहे. वाढते रुग्ण जिल्हा वासियांच्या चिंतेत भर घालणारे आहेत. खामगाव तालुक्यातील चितोडा गावात दोन रुग्णआढळून आज कोरोना संशयित वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे, मात्र अद्याप सदर महिलेच्या टेस्ट बाबत रिपोर्ट आला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली आहे. दरम्यान आता नागरिकांनी आता अधीक जागरूक राहण्याची व काळजी घेण्याची गरज आहे

बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची संख्या 17 झालेली आहेत. त्यात  खामगाव  तालुक्यातील चितोडा येथे 2 रुग्ण झाले आहेत. तर आयसोलेशन कक्षात उपचार घेत असलेल्या 65 वर्षीय महिलेचा आज मृत्यू झाला. ही महिला कोरोना संशयित असून ग्रामीण भागातील आहे. अद्याप या महिलेची कोरोना टेस्ट रिपोर्ट प्राप्त झालेली नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित यांनी सकाळ'शी बोलताना सांगितले

तालुकानिहाय रुग्ण
बुलढाणा जिल्ह्यात अजून पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून आता रुग्ण संख्या 17 वर पोहोचली आहेत. यात
बुलडाणा - 5 (मृत - 1) 
चिखली - 3,
शेगाव - 3  
खामगाव ( चितोडा) - 2
देऊळगाव राजा - 2 
सिदंखेडराजा- 1
मलकापूर - 1
असे तालुका निहाय रुग्ण आहेत.

loading image