24 Kg Silver Missing From Siddhanath Temple Sanctum
esakal
आटपाडी, ता. २४ : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री सिद्धनाथ मंदिरातील गाभाऱ्यातील चांदी दुरुस्तीच्या नावाखाली काढून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे भाविक, पुजारी व देवस्थान ट्रस्ट यांच्यात वाद पेटला असून संबंधित विभागाकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.