esakal | खोपोली शहरात भटक्या कुत्र्यांसाठी अँटी रेबीज लसीकरण मोहीम | Dog Bite
sakal

बोलून बातमी शोधा

Dog bite

खोपोली शहरात भटक्या कुत्र्यांसाठी अँटी रेबीज लसीकरण मोहीम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खोपोली : खोपोली (khopoli) शहरात भटक्या कुत्र्यांची (stray dogs) संख्या बेसुमार वाढली आहे. वारंवार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेण्याचे (dog bite), गाडीच्या मागे धावून पाठलाग करण्याचे प्रकार घडत असतात. त्या अनुषंगाने होणारे अपघातही वाढत आहेत. काही महिन्यांपूर्वी शिळफाटा (shilphata) येथील एका लहान मुलाला रेबीजमुळे (rabies) आपला प्राण गमवावा लागला होता.

हेही वाचा: शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना हलवलं दुसऱ्या रुग्णालयात

ह्या विषयातील गांभीर्य लक्षात घेऊन खोपोलीतील सजग प्राणी मित्रांनी व्ही. पी.डब्ल्यू. ए . अर्थात पशु वैद्यकीय व्यवसायिक हितवर्धिनी संघटना - डोंबिवली यांच्या माध्यमातून श्री कृपा एक्वेरियम- खोपोली, विविध प्राणी औषध निर्माण संस्था, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, कोविड ॲनिमल फिडर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या कुत्र्यांसाठी अँटी रेबीज लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे.02 ऑक्टोंबर पासून ही मोहीम सुरू होणार आहे.

28 सप्टेंबर हा "अखिल विश्व श्वान दंश निवारण दिन" म्हणून साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने ही मोहीम राबवून भटक्या कुत्र्यांचे अँटी रेबीज लसीकरण होणार आहे. दिनांक 2 ऑक्टोंबर पासून पुढील काही दिवस ही मोहीम राबवून खोपोली शहरातील जवळपास 300 भटक्या कुत्र्यांना लस दिली जाणार आहे. यासाठी होणारा सर्व खर्च संबधीत संघटना करणार असल्याची माहिती प्राण्यांचे डॉक्टर मुळेकर यांनी दिली. डॉ मुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री कृपा एक्वेरियमचे प्रवीण शेंद्रे, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे हनीफ कर्जीकर आणि इतर सदस्य, तसेच Covid-19 ॲनिमल फिडर ग्रुप अर्थात खोपोलीतील प्राणीप्रेमी या मोहिमेत सहभागी होणार आहेत.अँटी रेबीज लसीकरणानंतर श्वान दंशाने गंभीर बाधा होण्यापासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे असे प्रवीण शेंद्रे यांनी स्पष्ट केले आहे.

loading image
go to top