esakal | ''अजित पवारांनी जरंडेश्वर साखर कारखान्याचा खरा मालक सांगावा''
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar And Kirit somaiya

''अजित पवारांनी जरंडेश्वर साखर कारखान्याचा खरा मालक सांगावा''

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (deputy minister ajit pawar) निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाने (Income tax raid) छापेमारी केली आहे. त्याबाबत बोलताना अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन राजकारण केले जात आहे. तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे, असे अजित पवार म्हणाले. त्यावर आता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'अजित पवारांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याचे (Jarandeshwar sugar factory) खरे मालक कोण आहेत? हे सांगावे', असे सोमय्या म्हणाले.

हेही वाचा: अजित पवार कधी कुठलीच कागदपत्रे दडवत नाहीत - जंयत पाटील

''गेल्या अनेक महिन्यांपासून जरंडेश्वर साखर कारखान्याचे मालक कोण आहेत? हे अजित पवारांनी विचारले जात आहे. मात्र, अद्यापही त्या काऱखान्याचे खरे मालक कोण आहेत हे समजू शकले नाही. यांनी अनेक साखर कारखाने ढापले आहे. हे घोटाळेबाज ठाकरे आणि पवार सरकार अत्यंत खालच्या स्तरावरील राजकारण करत आहे'', असेही सोमय्या म्हणाले.

''कोण छापेमारी करत आहे आणि त्या चौकशीमधून नेमके काय समोर येते हे माहिती होण्यापूर्वीच अजित पवार निर्दोष असल्याचे सांगतात. या ठाकरे सरकारने कोरोनाच्या काळात पैसे ढापले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू झाले. हजारो कोटींचा घोटाळा करणारे ही भाषा वापरतात. त्याचे वाईट वाटते. तपास यंत्रणांनी चौकशी केली पाहिजे. १८ चौकशी केल्यानंतरही जरंडेश्वरचे मूळ मालक सापडत नाही. इतकी लपवाछपवी केली जाते'', असा आरोपही सोमय्यांनी केला.

loading image
go to top