
वाइन उद्योगाबद्दल राऊत यांना ज्ञान आहे का? सोमय्यांचा उपरोधिक टोला
महाराष्ट्र सरकारने किराणा दुकानात वाईन विक्रीचा (Wine in Supermarkets) निर्णय घेतल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका सुरु आहे. भाजपाचे किरीट सोमय्या यांनीही राज्यसरकारला धारेवर धरलं आहे. दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मागच्या काळात काही वाईनरी चालकांशी पार्टनरशीप केल्याचा आरोप करत सरकारने हा निर्णय घेण्यामागे काही लोकांचा फायदा असल्याचा आरोप सोमय्यांनी (Kirit somaiya) केला आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतित्युरही दिले होते. दरम्यान, या वादाच्या मुद्द्यावरुन आता सोमय्या यांनी पुन्हा एकदा एक ट्वीट करत शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाण साधला आहे. (Kirit Somaiya Criticize Sanjay Raut)
हेही वाचा: Political : राऊत, परबांविरुद्ध चंद्रकांत पाटील याचिका दाखल करणार
यात सोमय्या म्हणतात, अशोक गर्ग मॅगपी ग्रुपने 2021 मध्ये संजय राऊत यांच्या कुटुंबाला पार्टनरशिप दिली का? संजय राऊत आणि कुटुंबाला वाइन उद्योगाबद्दल अनुभव नाही. त्यांना अशा उद्योगाबद्दलचं ज्ञान, शिक्षण आहे का? संजय राऊत जवाब दो, असा सवाल त्यांनी राऊत यांना विचारला आहे. (Kirit Somaiya News)

हेही वाचा: अमित शहांचा मुलगा केळं विकतो का? संजय राऊतांचा सोमय्यांना सवाल
दरम्यान, राऊत कुटुंबियांचे वाईन उद्योजकांसोबत करार झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. त्यावर संजय राऊत यांनी जोरदार उत्तर दिलं. सोमय्यांनी जे नाव सांगितलं ते वाईनरी कंपनीत संचालक आहेत. संचालक असणं गुन्हा आहे का? भाजपच्या नेत्यांची मुलं केळी विकतात का? किरीट सोमय्यांचा मुलगा चने शेंगदाणे विकतो का? अमित शहांचा (Amit shaha) मुलगा केळी विकतो की ढोकळा विकतो? देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांची मुलं रोडवर स्टॉव टाकणार की डान्सबार टाकणार अशी तिखट शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली. एखाद्या कुटुंबाती व्यक्ती एखादा व्यवसाय करत असेल तर तो गुन्हा आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी केला होता. (Sanjay Raut News)
Web Title: Kirit Somaiya Criticised On Sanjay Raut Garg Magpie Group Of Partnership Winery
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..