'सेनेचा आमदार म्हणून सरनाईक यांचे गुन्हे माफ, पण...' - किरीट सोमय्या|Kirit Somaiya On Shivsena | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya on Pratap Sarnaik

'सेनेचा आमदार म्हणून सरनाईक यांचे गुन्हे माफ, पण...' - सोमय्या

मुंबई : ''शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांनी २००८-०९ मध्ये ठाणे विहांग गार्डन येथील ११४ सदनिकाधारकांची फसवणूक केली. त्यांनी ५ मजले अनधिकृत बांधले. २०१२ मध्ये प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. पण, ठाकरे सरकारने (Thackeray Government) आता शिवसेनेचा आमदार आहे म्हणून त्यांचे चोरी, गुन्हे माफ केले आहे. पण, महाराष्ट्राची जनता या घोटाळेबाज सरकारला कदापी माफ करणार नाही'', अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी केली.

हेही वाचा: किरीट सोमय्या ED चे प्रवक्ते आहेत का? नवाब मलिकांचा सवाल

गेल्या आठवड्यात लोकायुक्तांच्या समोर झालेल्या सुनावणीत ठाकरे सरकारने मान्य केले की प्रताप सरनाईक यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यांच्याकडून सगळा दंड व व्याज वसूल करून कारवाई केली जाणार असं सांगितलं होतं. पण, आता ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळांनी निर्णय घेतला की प्रताप सरनाईक शिवसेनेचा आमदार आहे म्हणून त्यांची चोरी, गुन्हे माफ केले. ठाकरे सरकार प्रताप सरनाईक यांना माफ करत आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला.

प्रताप सरनाईक यांनी ११४ सदनिकाधारकांची फसवणूक केली आहे. ही घटना घडली तेव्हा प्रताप सरनाईक शिवसेनेत नव्हते. याप्रकरणी २०२२ साली नजीब मुल्ला यांनी तक्रार केली. तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कारवाईचे आदेश दिले होते. उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या लोकांना मुर्ख समजतात का? असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला. ठाकरे सरकार चुकीचं काम करत आहे. प्रताप सरनाईक घोटाळेबाज आहेत. मग तुम्ही त्यांना मदत का करतात का? पण, मुख्यमंत्री तुम्ही महाराष्ट्राच्या लोकांना चुकीचा संदेश देऊ नका. त्यांना कशाला वाचवता आहात? मुख्यमंत्री लोकायुक्ताच्या समोर सांगतात, की आम्ही प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई करू. मग ठाकरे सरकार त्यांना का पाठीशी घालतात? असंही सोमय्या म्हणाले.

सरनाईक यांच्यावर कारवाईची मागणी -

प्रताप सरनाईक यांची मागणी होती की आमच्या गोष्टी माफ करा. पण, त्यावेळी त्यांना कोणीच माफ केलं नाही. मग आता का माफ करतात? फक्त तुमचे आमदार म्हणून त्यांना माफ केलं जात असेल तर चुकीचं आहे. त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. त्यांनी पैसे भरले पाहिजे, अशी मागणी सोमय्या यांनी केली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top