काँग्रेसला रोखण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरेंनी नाटक केलं : सोमैया

Sharad Pawar-Uddhav Thackeray-Kirit Somaiya
Sharad Pawar-Uddhav Thackeray-Kirit Somaiyaesakal
Summary

राज्यपालांनी कायदेशीर बाबींवरून महाविकास आघाडी सरकारला घेरलंय.

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी (Assembly Speaker) अनुभवी नेत्याची निवड व्हावी, असा मुद्दा पुढं आल्यानं माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचं नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आलं होतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांचंही त्यावर एकमत झालं होतं; पण राज्यपालांनी कायदेशीर बाबींवरून महाविकास आघाडी सरकारला घेरलं.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदानानं घेणं घटनाबाह्य असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी ठाकरे सरकारला कळवल्यानंतर, ठाकरे सरकारनं (Thackeray Government) राज्यपालांच्या पत्राला उत्तर देत त्यांचे मुद्दे खोडून काढले. यावर आता भाजप नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांनी प्रतिक्रिया देताना ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.

Sharad Pawar-Uddhav Thackeray-Kirit Somaiya
ममता बॅनर्जींच्या पक्षानं वाढवली काँग्रेस नेत्यांची चिंता

किरीट सोमैया म्हणाले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अथवा काँग्रेसचा (Congress) कोणी नेता विधानसभा अध्यक्ष नको होता, म्हणूनच शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) 'आवाजी मतदानाचे' नाटक केले का?, असा सवाल उपस्थित करत ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीकडं (Mahavikas Aghadi) 175 आमदार आहेत, तर भाजपकडं (BJP) 105 आमदार असताना देखील 'गुप्त मतदानात' काँग्रेसचा स्पीकर (अध्यक्ष) सहज निवडून आला असता. मात्र, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना हे करायचं नव्हतं, असा आरोप त्यांनी केलाय. राज्यपालांवर खापर फोडून काँग्रेसला पपलू बनवण्याचं काम ठाकरे-पवार यांनी केलंय, असा घणाघातही त्यांनी शेवटी केला.

Sharad Pawar-Uddhav Thackeray-Kirit Somaiya
'तू बसतोस की, मी बसू..'; मंचावरच भाजप नेत्यांत राडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com