
माझ्यावरील हल्ल्यापाठीमागे पोलिस कमिश्नर संजय पांडे जबाबदार - किरीट सोमय्या
माझ्यावरील हल्ल्यासाठी ठाकरे सरकारच स्पॉन्सर, सोमय्यांचा आरोप
माझ्यावर काल झालेल्या हल्ल्यामागे ठाकरे सरकारचा हात आहे. हा हल्ला ठाकरे सरकारने स्पॉन्सर केला हातो, असा आरोप भाजपाचे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. या हल्ल्याला पोलिस कमिश्नर संजय पांडे (PC Sanjay Pandey) जबाबदार आहेत, त्यांनी हा हल्ला घडवून आणाला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आज ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
भाजपाचे किरीट सोमय्या हे काल खार पोलिस स्टेशनमध्ये राणा दाम्पत्याला भेटायला गेले होते. यावेळी त्यांच्यावर काही शिवसैनिकांनी दगडफेक केली. याविषयी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, मी पोलिस स्टेशनमध्ये जाताना शिवीगाळ केली होती, त्यामुळे पोलिस ठाण्यातून बाहेर पडल्यावर शिवसैनिकांनी (Shivsainik) माझ्यावर हल्ला केला आहे. मी पोलिस ठाण्यात जाणार याची माहिती पोलिसांनी याआधीच शिवसैनिकांना देण्यात आली होती. ठाकरे सरकारकडून (Thackeray Govt.) माझ्यावर हल्ल्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
हेही वाचा: चोरांवर दोन दगड पडले तर तळमळ कशाला? राऊतांचा भाजपला सवाल
पुढे ते म्हणाले, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) माझ्या नावाने खोटी एफआयआर दाखल केली. ही खोटी असून एफआयआरवर मी सही करणार नाही असं सांगितलं होतं. यावरून मला धमकी देण्यात आली आणि सही केली नाही तर एफआयआर होईल असं सांगण्यात आलं. शिवसेनेच्या ७०-८० गुंडांनी माझ्यावर हल्ला केला, पोलिसांनी त्यांना संरक्षण होतं. हा हल्ला कसा झाला. माझ्यावर चप्पल, काचेच्या बाटल्या, चप्पल मारण्यात आले. माझ्यापासून शिवसेनेचे लोक तीन किलोमीटर दूर होते. लांबून एक दगड येऊन गाडीवर पडला असं या खोट्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे, असंही ते म्हणाले. माझा जीव घेण्याचा प्रयत्न खार पोलिसांच्या मदतीने शिवसेनेच्या गुंडांनी केला. मला थोडी जखम झाली, हा दगड जर का मला चार इंचावरती लागला असता तर मी आंधळा झालो असतो, असंही ते म्हणाले आहेत.
हा हल्ला ठाकरे पुरस्कृत होता. मी येणार हे माहिती असल्याने आधीपासूनच पोलिस स्टेशनमध्ये ७०-८० शिवसैनिकांनी एकत्र येण्याची तयारी केली होती. त्यांनी मला शिवीगाळ केला. मला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मला दुखापत झाली. पोलिसांनी या शिवसैनिकांच्या हवाली माझ्या गाड्या करण्याचं काम केलं. पोलिसांच्या दारात कसे काय एवढे गुंड राहू शकतात, असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.
हेही वाचा: 'सोमय्यांच्या गाडीखाली पोलिस कर्मचारी चिरडून लखीमपूर खिरी झाले असते'
Web Title: Kirit Somaiya Says Yesterday Attack Responsible Of Thackeray Govt And Police Commissioner Sanjay Pandey
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..