चोरांवर दोन दगड पडले तर तळमळ कशाला? राऊतांचा भाजपला सवाल

लोकांच्या भावना तीव्र होतात आणि असे प्रकार घडतात - राऊत
Sanjay Raut
Sanjay RautSakal
Summary

लोकांच्या भावना तीव्र होतात आणि असे प्रकार घडतात - राऊत

किरीट सोमय्या काल रात्री खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलिस स्टेशनला गेले होते. यावेळी किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. किरीट सोमय्या परतत असताना खार पोलिस स्टेशनबाहेर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगड फेकले. या हल्ल्यात सोमय्या जखमी झाले आहेत. त्यामुळे आता भाजपा नेत्यांच्या संतप्तजनक प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. देशाशी बेइमानी करणाऱ्या चोरांवर दोन दगड पडले तर भाजपला इतकी तळमळ मळमळ करण्याचे कारण काय?, असा सवाल त्यांनी ट्विट द्वारे केला आहे. आयएनएस विक्रांत घोटाळा हा देशद्रोह असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Sanjay Raut
'सोमय्यांच्या गाडीखाली पोलिस कर्मचारी चिरडून लखीमपूर खिरी झाले असते'

किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यावर ते म्हणाले, आयएनएस विक्रांत निधीचा अपहार करणारा आरोपी हा बोगस जात प्रमाणपत्र वापरून निवडून आलेल्या दुसऱ्या आरोपीला भेटायला जातो. लोकांच्या भावना तीव्र होतात आणि असे प्रकार घडतात. देशाशी बेइमानी करणाऱ्या चोरांवर दोन दगड पडले तर भाजपला इतके तळमळ मळमळ करण्याचे कारण काय? आयएनएस विक्रांत घोटाळा देशद्रोह आहे!, जय महाराष्ट्र... असे म्हणत त्यांनी किरीट सोमय्या आणि राणा पती-पत्नीवर टीकास्त्र सोडले आहे.

Sanjay Raut
सोमय्या हल्ल्यावरुन राणे भडकले, मातोश्रीत बसलेल्या सो कॉल्ड मर्दाने...

मागील काही दिवसांपासून आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी भाजपाचे किरीट सोमय्या यांची चौकशी सुरु आहे. .यामध्ये सोमय्यांनी मोठा घोटाळा करुन जनतेचे पैसे हडप केले असल्याचा आरोप राऊतांनी केला होता. दरम्यान, आता त्यांच्या या ट्विटवर आता सोमय्या काय प्रतित्त्युर देणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, याप्रकरणी किरीट सोमय्यांनीच आमच्या अंगावर गाडी चढवली असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. त्यामुळे घटना नेमकी काय घडली आहे यावर उलट सुलट चर्चा सुरु आहेत. एक बाजूला राणा दाम्पत्याच्या 'मातोश्री'वरील आंदोलनामुळे भाजपा आणि शिवसेनेतील संघर्ष वाढला असताना आता सोमय्या यांच्यावरील हल्ल्यामुळे राजकीय वातावरण गढूळ झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com