उद्यापर्यंत सत्य सांगा अन्यथा...; राऊत, परब सोमय्यांच्या निशाण्यावर

किरीट सोमय्यांनी संजय राऊत आणि कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत.
Kirit Somaiya
Kirit SomaiyaTeam eSakal
Updated on

भाजपनेते (BJP) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे सतत महाविकास आघाडीच्या (MVA Government) नेत्यांवर गंभीर आरोप करत असतात. आतापर्यंत त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या (Congress) अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांच्या रडारवर सध्या संजय राऊत (Sanjay Raut) आहेत. सोमय्या यांनी राऊत कुटुंब आणि अनिल परब यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत.

किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर गंभीर आरोप केले. राऊत काय-काय उद्योग करतात हे जनतेसमोर यायला सुरुवात झाली. प्रवीण राऊत यांनी पीएमसी बँकेचे १ हजार ९७ कोटी पीएमसी बॅंकेचे लंपास केले. प्रवीण राऊतची पत्नी माधुरी राऊत आणि वर्षा राऊत यांची पार्टनरशीप, कन्सस्ट्रक्शन कंपनी आहे असं म्हणत त्यांनी माधुरी राऊतसोबतच का पार्टनरशीप केली? असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे.

Kirit Somaiya
सध्या वादात असलेल्या बंडातात्यांनी लंडनमध्ये विलासरावांना माघार घ्यायला लावली होती

संजय राऊत यांच्यावर आरोप करताना पुढे सोमय्यांनी अनेक सवाल उपस्थित केले. राऊत म्हणतात आपली पत्नी शिक्षिका आहे, मात्र आतली गोष्ट काय आहे? कोणा कोणाला काय काय मिळालं? अलिबागची जागा मिळाली की दादरचा फ्लॅट मिळाला? प्रवीण राऊत आणि कंपनी आपल्याला कशी मदत करते.. कळू द्या लोकांना असं सोमय्या म्हणाले. विदिता संजय राऊत, पूर्वशी संजय राऊत, सुजित मुकुंद पाटकर कोण आहे? २०१० मध्ये प्रवीण राऊत यानं तुमची मदत केली होती असे अनेक आरोप त्यांनी केले.

दरम्यान, उद्या दुपारी ४ वाजता पुण्यातील शिवाजीनगर येथे राऊत परिवाराचे उद्योगधंद्यांसंबधीत एपआयआर आपण दाखल करणार असल्याचं सोमय्या म्हणाले. सोमय्यांनी असंही आवाहन केलं की, तुमचे उद्योगधंदे लोकांना उद्यापर्यंत सांगा अन्यथा मी सांगेल. चने, फुटाने आणि ढोकळा वगैरे बोलून विषय डायव्हर्ट करु नका असं सोमय्या म्हणाले.

Kirit Somaiya
महाशिवरात्रीला अमृता फडणवीसांंचं नवं गाणं येणार,भाजपच्या कार्यक्रमात घोषणा

किरीट सोमय्या यांनी यावेळी अनिल परब यांच्यावरही आरोप केले. अनिल परब वेगवेगळे उद्योग करतायत आणि म्हणतायत की, माझा काय संबंध, मी हिशोब देतो. अनिल परब यांनी विभास साठे यांच्याकडून जमीन घेतली होती. २ मे २०१७ रोजी ही जमीन परब यांनी ताब्यात घेतली. परब तुम्ही मंत्री आहात, नोबेल मिळवायचे आहे का ? महाराष्ट्राला लुटायचं लायसन्स मिळालं आहे का? असे प्रश्नही त्यांनी विचारले. तसंच त्यांच्या रिसॉर्ट प्रकरणावर बोलतानाही सोमय्यांनी गंभीर आरोप केले. सीआरझेड आहे, तरीही रिसॉर्ट बांधला, आणि म्हणून रिसॉर्ट पाडला असं ते म्हणाले. दरम्यान, या सर्व गोष्टींवरून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधला. मुख्यमंत्री काय करत आहेत? आता मुख्यमंत्री अनिल परब यांचा राजीनामा कधी घेणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com