Thur, June 8, 2023

किरीट सोमय्यांची सहकुटुंब पोलिसांत धाव; संजय राऊतांविरोधात तक्रार करणार
किरीट सोमय्यांची सहकुटुंब पोलिसांत धाव; संजय राऊतांविरोधात तक्रार करणार
Published on : 8 May 2022, 5:57 am
भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. आपण संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. याबाबतचं ट्विट सोमय्यांनी केलं आहे.
सोमय्यांसोबत यावेळी त्यांच्या पत्नी मेधा आणि मुलगा नील सोमय्या देखील असणार आहेत.
आपल्या ट्विटमध्ये सोमय्या म्हणतात, "उद्या सकाळी 11 वाजता मुलुंड पूर्व पोलिस स्टेशनला संजय राउत यांचा विरोधात तक्रार दाखल करण्या साठी मेधा, नील आणि मी जाणार आहोत, असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे."