
राणा दाम्पत्याला पोलीस स्टेशनमध्ये भेटायला गेलेल्या किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी आपल्या नावाने बोगस एफआयआर दाखल केल्याचा आऱोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याच आरोपाबद्दल आता भाजपा आक्रमक झाले असून किरीट सोमय्यांसह पक्षाच्या नेत्यांचा एक गट आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे.
याबद्दल ट्विट करत किरीट सोमय्या यांनी माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, "माझ्या नावाने जी तक्रार पोलीसांनी दाखल केली ती खोटी एफआयआर आहे असे खार पोलीस स्टेशनने मान्य केले आहे. माझ्यावर हल्ला करणाऱ्या शिवसेनेच्या गुंडांना वाचविण्यासाठी ही बोगस एफ आय आर दाखल करण्यात आली होती.याप्रकरणी आज १२.३० वाजता आम्ही महाराष्ट्राचा राज्यपालांना भेटणार आहोत"
किरीट सोमय्या यांच्यासोबत आज गोपाळ शेट्टी, प्रवीण दरेकर, मंगल प्रसाद लोढा, सुनील राणे हे भाजपा नेतेही राज्यपालांची भेट घेणार आहेत. यापूर्वी किरीट सोमय्या नुकतेच दिल्ली दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, तसंच केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची भेट घेतली होती. त्या दौऱ्यावरून परतताच सोमय्या आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
किरीट सोमय्या म्हणाले की, मुंबईचे पोलीस आय़ुक्त संजय पांडे यांनी माझा एफआयआऱ नोंदवून न घेण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. कारण त्यांना दीड महिन्यानंतर शिवसेनेत सामील व्हायचं आहे. या प्रकरणी आम्ही राज्यपालांकडे जाऊ आणि गरज भासल्यास हे प्रकरण उच्च न्यायालयातही नेऊ.