
'रश्मी ठाकरे लबाडी करु शकत नाहीत, मात्र उद्धव ठाकरे लबाडी करु शकतात'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व नकली, सोमय्यांचा हल्लाबोल
मुंबईतील बीकेसी मैदानावर काल शिवेसेनेची जाहीर सभा झाली आहे. दरम्यान, विरोधकांकडून या सभेवर टीका करण्यात येत असून आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांचं हिंदुत्व नकली आहे हे महाराष्ट्राला कालच्या सभेतून समजंल आहे. मुख्यमंत्र्यांचं हिंदुत्वाचं स्वरुपन कसं आहे हेही काल जनतेला समजले आहे. अजान बंद झाली म्हणून मुख्यमंत्र्यांची बोबडी वळली आहे, असा हल्लाबोल भाजपाचे किरीट सोमय्या यांनी केली आहे.
सोमय्या म्हणाले, उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व कस आहे ते आता जनतेला समजंल आहे. बाळासाहेब ठाकरे असली होते मात्र उद्धव ठाकरे नकली आहेत, असा घणाघात त्यांनी केला आहे. आम्हाला असली आणि नकली शिकवू नका. मी भ्रष्टाचार केला म्हणून माझ्यावर हल्ला करण्यातल आला, असेही ते आहे. यावेळी त्यांनी १९ बंगल्यावरून पुन्हा मुख्यमंत्री ठाकरे आणि रश्मी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. माझ्याकडे १९ बंगले केव्हाच नव्हते, असे रश्मी ठाकरे म्हणाल्या आहेत. मात्र एक पुरावा सादर करत सोमय्या म्हणाले, १९ बंगल्यांच्या बाबतीत रश्मी ठाकरे लबाडी करु शकत नाहीत, मात्र त्यांचे पती उद्धव ठाकरे लबाडी करु शकतात.
हेही वाचा: पुढील ४८ तासांत मान्सून बंगालच्या उपसागरावर दाखल होणार - IMD
किरीट सोमय्या यांनी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. अनिल देशमुख, दाऊदशी संबंध असणारे नवाब मलिक, मंत्री अनिल परब हे सर्व भ्रष्ट नेते या आघाडी सरकारमध्ये आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी होणार आहे हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असेही ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे तुम्ही खुर्चीसाठी तुम्ही खोटे बोलत आहात.
दरम्यान, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवेसेनेच्या जाहीर सभेत बोलताना भाजप नेत्यांना टोले लगावले आहेत. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी बोचरी टीका केली आहे. बाबरीच्या प्रकरणावरून ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस तुम्ही जर खरंच तिकडे गेला असता तर तुमच्या फक्त वजनाने बाबरी खाली आली असती. हिंदुत्वासाठी तुम्ही काय केलंय? बाबरी तर पाडली नाहीच, ती आमच्या शिवसैनिकांनी पाडली हे आम्ही अभिमानाने सांगतो. तुम्ही म्हणता की आम्ही बाबरी पाडली, ती काय शाळेची सहल होती का?, असा सवालही त्यांनी केला आहे.
हेही वाचा: ही केमिकल लोच्याची केस, राज ठाकरेंचं नाव न घेता मुख्यमंत्र्यांची टीका
Web Title: Kirit Somiya Criticized To Cm Uddhav Thackeray On Yesterday Statement On Meeting
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..