किर्लोस्‍कर मोटर्सकडून 'हाय-एफिशिएन्‍सी लो व्‍होल्‍टेज इलेक्ट्रिक मोटर्स'च्या लाँच ची घोषणा

उच्‍च दर्जाची कामगिरी व कार्यक्षमतेच्‍या खात्रीसाठी या मोटर्स बीआय-प्रमाणित
Kirloskar Motors
Kirloskar Motorssakal

मुंबई : किर्लोस्‍कर ऑईल इंजिन्‍स लिमिटेड (केओईएल) ही इंजिन्‍स, पॉवर जनरेटिंग सेट्स व कृषी उपकरणांमधील उद्योग अग्रणी कंपनी आहे.नवीन उत्‍पादने व सेवा सादर करत ग्राहकांच्‍या जीवनामध्‍ये सकारात्‍मक परिणाम घडवून आणण्‍याच्‍या दृष्टीकोनाशी बांधील राहत किर्लोस्‍कर ऑईल इंजिन्‍स लिमिटेड 'हाय-ए‍फिशिएन्‍सी लो व्‍होल्‍टेज इलेक्ट्रिक मोटर्स' लवकरचं बाजारात लॉंच करणार आहे.

उच्‍च दर्जाची कामगिरी व कार्यक्षमतेच्‍या खात्रीसाठी या मोटर्स बीआय-प्रमाणित, एनएबीएल-मान्‍यताकृत टेस्‍ट लॅबकडून चाचणी करण्‍यात आलेल्‍या आहेत.तसेच या मोटर्स हाय-ग्रेड कॉपर वायर्स व टाइपसह उत्‍पादित करण्‍यात आल्‍या आहेत. दर्जात्‍मक उत्‍पादनांची श्रेणी, सर्वोत्तम विक्री व सेवा नेटवर्कच्‍या पाठबळासह किर्लोस्‍कर ऑईल इंजिन्‍स 'अपेक्षांपलीकडे कामगिरी' या मिशनसह इलेक्ट्रिक मोटर्स बाजारपेठेत प्रवेश करत आहे.

''आम्‍ही नेहमीच ग्राहकांचे समाधान करण्‍यासोबत त्‍यांना बचत करण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी उत्‍पादने व सोल्‍यूशन्‍स सादर केले आहेत. हीच परंपरा कायम राखत आम्‍हाला किर्लोस्‍कर मोटर्सची आमची नवीन श्रेणी सादर करण्‍याचा आनंद होत आहे.मोटर्सची आमची नवीन श्रेणी दर्जात्‍मक कार्यक्षमता देईल आणि उच्‍च-कार्यक्षमतेमुळे ऊर्जा वापर कमी करेल.' असे 'या प्रसंगी बोलताना कार्यकारी अध्‍यक्ष श्री. अतुल किर्लोस्‍कर म्‍हणाले,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com