Maharashtra Politics: कीर्तीकर पिता-पुत्रात 'फाळणी'; वडील शिंदे गटात, तर मुलगा ठाकरे गटात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics: कीर्तीकर पिता-पुत्रात 'फाळणी'; वडील शिंदे गटात, तर मुलगा ठाकरे गटात

Maharashtra Politics: कीर्तीकर पिता-पुत्रात 'फाळणी'; वडील शिंदे गटात, तर मुलगा ठाकरे गटात

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सुरू झालेली शिवसेनेची पडझड अजूनही थांबताना दिसत नाहीये. उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला असून खासदार गजानन किर्तिकर यांनी एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यानंतर उद्दव ठाकरे यांना हा एक मोठा धक्का बसला असून, खासदार गजानन किर्तिकर यांनी एकनाथ शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.

हेही वाचा: हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

शिवसेनेचे जुने नेते, खासदार गजानन कीर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात काल प्रवेश केला आहे. कीर्तीकर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जुने सहकारी आहेत. त्यांच्या शिंदे गटात जाण्यामुळे ठाकरे गटाचे मोठं नुकसान झालं आहे. कारण त्यांचा राजकीय अनुभव हा ठाकरे गटासाठी फार महत्त्वाचा होता. गजानन कीर्तीकर यांच्या शिंदे गटात जाण्याने ठाकरे गटातील खासदारांची संख्या आणखी कमी झाली आहे. विशेष म्हणजे गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात गेले असले तरी त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर यांनी ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतलाय.

हेही वाचा: Shivsena: ठाकरे गटाची पडझड थांबेना! गजानन किर्तिकरांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

“वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ऐकलं नाही. शिंदे गटात जाण्याचा वडिलांचा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे”, अशी प्रतिक्रियाही अमोल कीर्तीकर यांनी दिली आहे. गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात जाणार असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर त्यांनी काल माहीम विधानसभा नागरीक सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी कीर्तीकर यांनी आपल्या मुलाचा शिंदे गटात प्रवेश करण्यास विरोध होता. त्यामुळे आपल्या प्रवेशाला उशिरा झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

हेही वाचा: Sanjay Raut: या चिमण्यांनो परत फिरा... बंडखोरांना संजय राऊतांनी घातली साद