Kirtikumar Shinde Resign: "देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक क्षण अन् राजसाहेबांनी बदलली भूमिका"; जुन्या सहकाऱ्याने सोडली साथ

Kirtikumar Shinde Resign: राज ठाकरे यांनी काल मेळाव्यामध्ये महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता या निर्णयाचे पडसाद पक्षाच दिसून येत आहेत.
Kirtikumar Shinde Resign
Kirtikumar Shinde ResignEsakal

Kirtikumar Shinde Resign: निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देत असल्याचं काल(मंगळवारी) जाहीर केलं. त्यांच्या या भूमिकेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे, गेल्या काही दिवसांमध्ये मनसे महायुतीसोबत जाणार असल्याच्या आणि काही जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. अशातच त्यांनी काल मनसेच्या मेळाव्यात आपण महायुतीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडल्यानंतर मनसेचे सरचिटणीस कीर्ती कुमार शिंदे यांनी परखड पोस्ट शेअर करत मनसेला जय महाराष्ट्र केला आहे.

पोस्टमध्ये कीर्ती कुमार शिंदे यांनी राज ठाकरेंच्या आधीच्या आणि आताच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आहे. 'आज ५ वर्षांनी देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी त्यांची राजकीय भूमिका बदलली आहे. ती किती चूक, किती बरोबर, हे राजकीय विश्लेषक सांगतीलच. सध्याच्या काळात राजकीय नेते त्यांना हवे तेव्हा त्यांना हवी ती राजकीय भूमिका घेऊ शकतात. पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुचंबणा होते. त्याचं काय?', असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Kirtikumar Shinde Resign
Raj Thackeray : ‘केवळ मोदींसाठी महायुतीला पाठिंबा’

त्याचबरोबर त्यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी देशाचं वाटोळं केलं आहे, असा टोला देखील कीर्ती कुमार शिंदे यांनी लगावला आहे.

त्याचबरोबर 'राजसाहेब ठाकरे यांनी 'भामोशा'ची बाजू घेणं हे त्यांच्या स्वतःसाठी गरजेचं असू शकतं, पण त्यातून महाराष्ट्राचा- मराठी माणसाचा कोणताही लाभ होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यांची ही भूमिका सत्तेच्या राजकारणात, मनसेचे आणि स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी योग्य असू शकेल, पण त्यांनी घेतलेली बाजू सत्याची नाही', असं म्हणत त्यांनी आपली परखड भूमिका मांडली आहे.

Kirtikumar Shinde Resign
Raj Thackeray Sabha: "ते म्हणाले आमच्या चिन्हावर लढा पण..."; राज ठाकरेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

काय म्हटलं आहे पोस्टमध्ये?

अलविदा मनसे!

"महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, विधानपरिषद नको, बाकीच्या वाटाघाटी नको. हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे..." अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात या शब्दांत आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या राजकीय भूमिकांचं एक 'अनाकलनीय' वर्तुळ पूर्ण झालं.

पाच वर्षांपूर्वी २०१९ लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राजसाहेब ठाकरे यांनी भाजप- मोदी- शाहविरोधात रणशिंग फुंकलं होतं तो माझ्यासाठी (राजकीय पातळीवर) अत्यंत महत्त्वाचा काळ होता. त्या दिवसांत त्यांनी घेतलेल्या सर्व जाहीर- 'लाव रे तो व्हिडिओ' सभांना मी उपस्थित होतो आणि सभांमध्ये ते जे भाजप- मोदी- शाह यांच्या विरोधात जे तथ्य- विचार मांडत होते त्यांबद्दल सविस्तर लेख लिहून त्यांची भूमिका अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो.

Kirtikumar Shinde Resign
Loksabha Election : अठराव्या वर्षांतल्या ‘मनसे’कडे सर्वांचे लक्ष ; राज ठाकरे यांची आज सभा,फडणवीसांनी व्यक्त केली पाठिंब्याची अपेक्षा

आज ५ वर्षांनी देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी त्यांची राजकीय भूमिका बदलली आहे. ती किती चूक, किती बरोबर, हे राजकीय विश्लेषक सांगतीलच. सध्याच्या काळात राजकीय नेते त्यांना हवे तेव्हा त्यांना हवी ती राजकीय भूमिका घेऊ शकतात. पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुचंबणा होते. त्याचं काय?

गेल्या १० वर्षांत, त्यातही विशेष करून मागच्या ५ वर्षांत 'भामोशा'ने देशाचं अक्षरशः वाटोळं केलं आहे. पारदर्शक कारभाराचा दावा करत सत्तेवर येऊन 'भामोशा' अपारदर्शक हुकूमशाहीने दडपशाही करत आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या चौकशांचा ससेमिरा पाठीमागे लावून भाजपेतर राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि त्यांच्या निकटवर्तीयांना गजाआड पाठवण्याची भीती दाखवून वॉशिंग मशीनमध्ये घालून त्यांचे शुद्धीकरण करून त्यांचे 'भामोशा'मध्ये सक्तीने पक्षांतर करवून घेतले जात आहे. 'भामोशा'चे विचार ज्यांना पटतात ते राष्ट्रप्रेमी किंवा हिंदू, आणि 'भामोशा'च्या विरोधात आहेत ते राष्ट्रद्रोही किंवा अहिंदू! या नव्या समीकरणामुळे जातपातधर्माच्या नावाखाली माणसाला माणूसपणापासून तोडण्याचे काम सुरू आहे. अत्यंत नम्रपणे सांगतो की, प्रबोधनकारांची अनुपलब्ध पुस्तके प्रकाशित करून त्यांचा वैचारिक वारसा जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या माझ्यासारख्याला 'भामोशा'चं असलं राष्ट्रीयत्व- 'हिंदुत्व' मान्यच होऊ शकत नाही.

Kirtikumar Shinde Resign
Raj Thackeray : मनसे महायुतीत सामिल होणार का? फडणवीसांचे संकेत; म्हणाले, राज ठाकरे पहिले व्यक्ती...

राजसाहेब ठाकरे यांनी 'भामोशा'ची बाजू घेणं हे त्यांच्या स्वतःसाठी गरजेचं असू शकतं, पण त्यातून महाराष्ट्राचा- मराठी माणसाचा कोणताही लाभ होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यांची ही भूमिका सत्तेच्या राजकारणात, मनसेचे आणि स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी योग्य असू शकेल, पण त्यांनी घेतलेली बाजू सत्याची नाही.

खरं तर असे अनेक मुद्दे राजसाहेबांशी भेटून बोलायचे होते. पण ते शक्य नाही! त्यामुळे हा प्रवास इथेच थांबवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीसपदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देत आहे.

एक गोष्ट इथे आवर्जून नमूद करतो. राजसाहेब ठाकरे, अमित ठाकरे आणि मनसेचे सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी मला नेहमीच प्रेमाने आणि उचित सन्मानाने वागवलं. त्यांच्यामुळे मला अनेक चांगल्या विषयांवर काम करता आलं. मनसे सोडण्याच्या माझ्या या भूमिकेचा- कृतीचा कुठल्यातरी उथळ गोष्टीशी बादरायण संबंध जोडून उठवळ राजकारणाचा धुरळा उडवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, ही अपेक्षा.

कीर्तिकुमार शिंदे

Kirtikumar Shinde Resign
Raj Thackrey: कल्याण लोकसभेवर मनसेच्या इंजिनला थांबा? पाडव्याचा मुहूर्त राज ठाकरे साधणार का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com